
पाकिस्तानी खेळाडू बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेत खेळत आहेत. त्यामुळे त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळाल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. पण या व्यासपीठावर पाकिस्तानी क्रिकेटपटूंची सुमार कामगिरी सुरू आहे. कारण या स्पर्धेत पाकिस्तानच्या सर्वच खेळाडूंनी निराशा केली. आता त्यांच्या कृतीमुळे पाकिस्तानचं नाक कापलं जात आहे. बाबर आझमने सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात संथ गतीने फलंदाजी केली. त्यामुळे आधीच क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. एका बाजूने स्टीव्ह स्मिथ आक्रमक खेळी करून संघाला विजयाच्या वेशीवर घेऊन जात होता. तर दुसऱ्या बाजूला बाबर आझमच्या संथ खेळीमुळे संघ अडचणीत येतो की काय अशी भावना निर्माण झाली होती. 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाबर आझम एक धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. पण स्टीव्ह स्मिथने त्याला नकार दिला. त्यामुळे बाबरचा संताप झाला. स्टीव्ह स्मिथला पुढे पावरप्लेचं षटक खेळायचं होतं. त्यामुळे त्याने नकार दिला.
स्टीव्ह स्मिथने पुढच्या षटकात सलग 6 षटकार मारले आणि पाचव्या चेंडूवर 4 मारला. या षटकात एकूण 32 धावा आल्या. त्यानंतरच्या म्हणजेच 13व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबर आझम बाद झाला. त्यामुळे त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण आधीच्या षटकात स्ट्राईक न देता बाबर आझमची लाज काढली होती. त्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे मैदानाबाहेर जाताना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग होता. त्याने सीमेरेषेजवळ गेला आणि जोरात बॅट फिरवली. त्याच्या अशा वागण्यावर आता टीका होत आहे.
“Wasn’t happy, Babar.” 😳
Drama in the middle of the SCG after Steve Smith knocked back a run from Babar Azam, so he could take strike during the Power Surge. #BBL15 pic.twitter.com/rTh0RXE0A5
— KFC Big Bash League (@BBL) January 16, 2026
सिडनी थंडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 189 धावा केल्या. तसेच विजयासाठी 190 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सिडनी सिक्सर्सने 17.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार स्टीव्ह स्मिथ.. त्याने 42 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकार मारत 100 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, ‘ही एक चांगली विकेट होती, अर्थातच 190 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली करावी लागली. बाबर आणि माझी तिथे खूप छान भागीदारी झाली ज्यामुळे प्लॅटफॉर्म तयार झाला. मग सर्जवर पोहोचलो आणि वेळ आली. तर, सर्जवर कुंपणावरून काही मारले आणि आम्हाला शर्यतीत पुढे आणले.’