BAN vs ENG, 3rd T20I | बांगलादेशचा सलग तिसरा विजय, इंग्लंडवर 16 धावांनी मात

| Updated on: Mar 14, 2023 | 6:51 PM

बांगलागदेशने टी 20 क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. वर्ल्ड चॅम्पियन अशी बिरुदावली मिरवणाऱ्या इंग्लंडचा 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे.

BAN vs ENG, 3rd T20I | बांगलादेशचा सलग तिसरा विजय, इंग्लंडवर 16 धावांनी मात
Follow us on

ढाका | बांगलादेशने टी 20 क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. इंग्लंडने 2022 साली वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. या वर्ल्ड चॅम्पियन ठरललेल्या इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. बांगलादेशने टी 20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडवर 16 धावांनी मात केली आहे. बांगलादेशने इंग्लंडला विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांना बांगलादेशच्या गोलंदाजांनी रोखलं. बांगलादेशच्या गोलंदाजांनी या विजयी आव्हानाचा शानदार बचाव केला. इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 142 धावाच करता आल्या. या विजयासह बांगलादेशने 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवत इंग्लंडला क्लीन स्वीप दिला आहे.

इंग्लंडकडून डेव्हिड मलान याने सर्वाधिक 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्या खालोखाल कॅप्टन जोस बटलर याने 31 बॉलमध्ये 40 धावांचं योगदान दिलं. फिलीप सॉल्ट याला भोपळाही फोडता आला नाही. बेन डकेट 11 धावा करुन माघारी परतला. मोईन अलीला विशेष काही करता आलं नाही. तो 9 धावा करुन मैदानाबाहेर गेला. सॅम करनला 4 धावाच करता आल्या. तर ख्रिस वोक्स आणि ख्रिस जॉर्डन ही जोडी अनुक्रमे नाबाद 13 आणि 2 धावांवर नाबाद परतली. या दोघांना विजय मिळवून देण्यात अपयश आलं.

बांगलादेशकडून तास्किन अहमद याने 2 तर तन्वीर अस्लम, कॅप्टन शाकिब अल हसन आणि मुस्तफिजून रहमान या तिकडीने प्रत्येकी 1 फलंदाजाला आऊट केलं.

बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी

 

त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. बांगलादेशकडून लिटॉन दास याने 57 बॉलमध्ये 73 धावांनी अफलातून खेळी केली. रॉनी तालुकदारने 24 धावा केल्या. नजमुल शांतो याने 36 बॉलमध्ये नाबाद 47 आणि कॅप्टन शाकिबने 4* धावा केल्या.

बांगलादेशने इंग्लंडला असा दिला क्लीन स्वीप

पहिला सामना, 6 विकेट्सने विजय

दुसरा सामना, 4 विकेट्सने विजय

तिसरा सामना, 16 धावांनी विजय

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास (विकेटकीपर), रॉनी तालुकदार, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदयॉय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, तन्वीर इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि हसन महमूद

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, डेविड मलान, बेन डकेट, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, रेहान अहमद आणि जोफ्रा आर्चर.