
पाकिस्तानने 13 मार्चला दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने मात केली. पाकिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशच्या सलामीवीर फलंदाजाने शतकी खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये आयोजित सामन्यात बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 290 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशला 290 धावांपर्यंत पोहचवण्यात ओपनर तांझिद हसन तमीन याने प्रमुख भूमिका बजावली. तांझिदने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक झळकावलं. तसेच तांझिदने या खेळीसह मोठा विक्रम मोडीत काढला.
तांझिदने पाकिस्तान विरुद्ध 100 च्या स्ट्राईक रेटने 107 बॉलमध्ये 107 रन्स केल्या. तांझिदने या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार लगावले. तांझिदने या 7 षटकारांसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
तांझिदने सेफ हसन याच्यासह बांगलादेशसाठी सलामी शतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी करत बांगलादेशला भक्कम सुरुवात मिळवून दिली. सेफ आऊट झाल्याने सेट जोडी फुटली. त्यानंतर तांझिदने एक बाजू लावून धरुन बांगलादेशचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला.
तांझिदने या दरम्यान एकदिवसीय कारकीर्दीतील अनेक दिवसांची प्रतिक्षा संपवली. तांझिदने तिसाव्या एकदिवसीय सामन्यात पहिलंवहिलं शतक झळकावलं. मात्र तांझिद शतकांनतर ही खेळी मोठी करण्यात अपयशी ठरला. तांझिद 107 धावांवर बाद झाला.
तांझिद बांगलादेशसाठी पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला. तांझिदने याबाबतीत सौम्य सरकार याला पछाडलं.सौम्य सरकार याने 2015 साली पाकिस्तान विरुद्ध नाबाद 127 धावांची खेळी केली होती. सौम्यने त्या खेळीत 6 षटकार लगावले होते.
तांझिद हसन तमीमचा शतकी तडाखा
Tanzid Hasan Tamim celebrates his first ODI hundred with pure passion and flair at SBNCS. 🇧🇩
#BCB #Cricket #Bangladesh #Pakistan #ODI pic.twitter.com/xQy8BXLTwz
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 15, 2026
तांझिद हसन तमीम : 7 सिक्स, (2026)
सौम्य सरकार : 6 सिक्स, (2015)
तांझिद हसन तमीम : 5 सिक्स, (2026)
अनामुल हक : 4 सिक्स, (2014)
तमीम इक्बाल : 3 सिक्स, (2015)
दरम्यान बांगलादेशने पाकिस्तानसमोर 291 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. त्यामुळे आता पाकिस्तान सलग दुसऱ्या विजयासह मालिका आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरणार की यजमान बांगलादेश सीरिजवर नाव कोरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.