AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odi Series : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, टी 20I कॅप्टन आऊट, कॅप्टन कोण?

Bangladesh vs West Indies Odi Series 2025 : बांगलादेश मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बांगलादेशने या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशने याआधी अफगाणिस्तान विरुद्ध क्लीन स्वीपने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे बांगलादेशसमोर कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.

Odi Series : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, टी 20I कॅप्टन आऊट, कॅप्टन कोण?
Bangladesh vs IndiaImage Credit source: AP
| Updated on: Oct 17, 2025 | 12:59 AM
Share

टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता वेस्ट इंडिज बांगलादेश दौऱ्यात वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. वेस्ट इंडिजने या दोन्ही मालिकांसाठी 14 ऑक्टोबरला संघ जाहीर केला. त्यानंतर आता गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी यजमान बांगलादेशने विंडीज विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मेहदी हसन मिराज या मालिकेत बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे.

उभयसंघात शनिवारपासून अर्थात 18 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. बांगलादेशचा याआधी अफगाणिस्तानने वनडे सीरिजमध्ये 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. बांगलादेशच्या या मालिका पराभवानंतर वेस्ट इंडिज विरूद्धच्या सीरिजसाठी 2 बदल करणयात आले आहेत. तसेच महिदुल इस्लाम अंकोन याला पहिल्यांदाच एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे.

कुणाला संधी?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ओपनर मोहम्मद नईम याला वगळलं आहे. तसेच वेगवान गोलंदाज नाहिद राणा यालाही संधी देण्यात आलेली नाही. तर सौम्य सरकारचं कमबॅक झालं आहे. टी 20I कॅप्टन लिटन दास याला दुखापतीमुळे विंडीज विरूद्धच्या मालिकेला मुकावं लागलं आहे. लिटनला आशिया कप 2025 स्पर्धेत दुखापत झाली होती. लिटनला या दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेलाही मुकावं लागलं होतं.

बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 ऑक्टोबर, ढाका

दुसरा सामना, 21 ऑक्टोबर, ढाका

तिसरा सामना, 23 ऑक्टोबर, ढाका

विंडीजची शेवटच्या वनडे सीरिजमधील कामगिरी

दरम्यान वेस्ट इंडिजने आपली शेवटची एकदिवसीय मालिका जिंकली होती. वेस्ट इंडिजने मायदेशात पाकिस्तानला 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभूत केलं होतं. उभयसंघात 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान या मालिकेचा थरार रगंला होता. पाकिस्तानने विजयी सुरुवात केली होती. मात्र विंडीजने सलग 2 सामने जिंकत मालिकेवर नाव कोरलं होतं. त्यामुळे आता विंडीज बांगलादेशला त्यांच्यात घरात पराभूत करणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशचा संघ

वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी बांगालादेश टीम : मेहदी हसन मिराज (कॅप्टन), तंजीद हसन तमीम, सौम्या सरकार, मोहम्मद सैफ हसन, नजमुल हुसैन शांतो, तौहीद हृदोय, महिदुल इस्लाम अंकोन, जाकेर अली, तनवीर इस्लाम, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शमीम हुसैन, तंजीम हसन साकिब काजी नुरुल हसन सोहन, रिशाद हुसैन आणि हसन महमूद.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण.

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण