
मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या आशिया कपसाठी पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळनंतर बीसीसीआयने 21 ऑगस्ट रोजी टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडियात 17 जणांची निवड करण्यात आली. रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर हार्दिक पंड्या हाच उपकर्णधार असणार आहे. आशिया कपला आता मोजून 7 दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्याआधी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा वेगवान गोलंदाज हा दुखापतीमुळे आशिया कपमध्ये बाहेर पडला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
आशिया कपमधून वेगवान गोलंदाज एबादोत हुसेन बाहेर पडला आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट टीमची अडचण वाढली आहे. एबादोतच्या जागी 20 वर्षीय युवा अनकॅप्ड खेळाडूला संधी देण्यात आली आहे. एबादोतची दुखापत ही तांझिम हसन साकिब याच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे आता तांझिमला आशिया कपमधून एकदिवसीय पदार्पण करण्याची संधी मिळते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
दरम्यान बांगलादेश स्पर्धेतील आपला पहिला सामना हा श्रीलंका विरुद्ध कँडी इथे खेळणार आहे. हा सामना गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर बांगलादेश 3 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध लाहोर इथे साखळी फेरीतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळेल.
यंदा आशिया कपसाठी नेपाळ क्रिकेट टीमनेही क्वालिफाय केलं आहे. त्यामुळे सहभागी संघांची संख्या ही 5 वरुन 6 झाली आहे. त्यामुळे 6 टीम 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आल्या आहेत. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ
ए ग्रुपमध्ये आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ग्रुप बी मध्ये आहेत.
बांगलादेशला मोठा झटका
Bangladesh have made some changes to their Asia Cup squad.
Details 👇https://t.co/uKi6WR3Lnw
— ICC (@ICC) August 22, 2023
शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसेन ध्रुबो, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक महेदी हसन, शेख महेदी हसन, शमीम हुसेन, तनजीद हसन तमीम आणि तनझिम हसन साकीब.