AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Points Table : स्पर्धेतून बांगलादेशचं आव्हान संपुष्टात, उपांत्य फेरीसाठी कोणाला कशी संधी ते जाणून घ्या

World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बांगलादेशचा गाशा गुंडाळला गेला आहे. आता 9 संघांना उपांत्य फेरीसाठी कशी संधी आहे ते जाणून घेऊयात..

World Cup 2023 Points Table : स्पर्धेतून बांगलादेशचं आव्हान संपुष्टात, उपांत्य फेरीसाठी कोणाला कशी संधी ते जाणून घ्या
World Cup 2023 Points Table : बांगलादेशचा स्पर्धेतून खेळ खल्लास, जाणून घ्या 9 संघांमध्ये उपांत्य फेरीची चुरसImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 28, 2023 | 10:35 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा सहावा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात जवळपास अर्ध चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सातव्या टप्प्यात उपांत्य फेरीचं गणित समजून येईल. दक्षिण अफ्रिका, भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सध्याच्या स्थितीत उपांत्य फेरीचे दावेदार आहेत. पण एखादा चमत्कार घडला तर बांगलादेश सोडून इतर चार संघांना संधी असणार आहे. इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान यांचं गणित जर तर वर अवलंबून असणार आहे. भारताने एक सामना जिंकताच उपांत्य फेरीचं निश्चित होणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात उपांत्य फेरीच्या पहिल्या संघावर मोहोर लागेल. तर इंग्लंडचा पराभव झाला तर स्पर्धेतून गाशा गुंडळणारा दुसरा संघ ठरेल.

  • दक्षिण अफ्रिका 6 सामन्यात 10 गुण आणि +2.032 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेने आणखी दोन सामन्यात विजय मिळवल्यास स्थान पक्क होईल. दक्षिण अफ्रिकेला आणखी तीन सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तानशी सामना असणार आहे.
  • भारताने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळत 10 गुण आणि +1.353 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने दोन सामने जिंकताच उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल. भारताचा सामना इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण अफ्रिका आणि नेदरलँडशी होणार आहे.
  • न्यूझीलंड सहा पैकी चार सामने जिंकत तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे 8 गुण असून उर्वरित 3 सामन्यात विजय मिळवल्यास 14 गुण होतील आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. पण संघाच्या जय पराजयावर बरंच काही अवलंबून आहे.
  • ऑस्ट्रेलियाने सुरुवातील दोन सामने गमवाले होते. मात्र सलग चार विजय मिळवत उपांत्य फेरीची शर्यतीत स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवताच उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होणार आहे. पण एकही सामना गमवल्यास इतर संघांना संधी मिळू शकते.
संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504
  • श्रीलंका 5 सामन्यातील 2 सामन्यात विजय मिळवत 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. अजून 4 सामने खेळायचे आहेत. चार पैकी चार सामन्यात विजय मिळवला तर 12 गुण होतील. असं गणित जुळून आलं तर जर तर वर अवलंबून असेल. पण एक जरी सामना गमवला तर कठीण आहे.
  • पाकिस्तानचा स्पर्धेतील गाशा जवळपास गुंडाळलेला आहे. तीन पैकी एक सामना गमवला की संपलं. पण वरच्या संघांमध्ये काही गडबड झाली की संधी मिळू शकते. सुरुवातीला दोन सामन्यात विजय मिळवला होता.मात्र त्यानंतर सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
  • अफगाणिस्तानचंही पाकिस्तानसारखंच आहे. पण तीन ऐवजी चार सामने खेळायचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानपेक्षा एक संधी अधिक आहे. इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर चार सामन्यात काहीही होऊ शकतं. त्यामुळे अफगाणिस्तानसाठी शर्यत अजून संपलेली नाही.
  • नेदरलँडला उपांत्य फेरीत पोहोचेल असं काही चित्र नाही. पण काही उलटफेर झाला तर नक्कीच संधी आहे. दुसरीकडे एखाद्या संघाचा खेल खल्लास करू शकतो. त्यामुळे मी नाही तर तू सुद्धा अशा स्थितीत नेदरलँड असेल. बांगलादेश आणि दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून नेदरलँडने दाखवून दिलं आहे.
  • इंग्लंडला संधी आहे. पण मोठा चमत्कार घडला तरच तसं काही होऊ शकतं. सध्या इंग्लंडचे पाच पैकी चार सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुले उर्वरित चार सामन्यात विजय मिळवल्यास 10 गुण होतील. पण नेट रनरेट एकदमच खराब आहे. त्यामुळे एक पराभव आणि खेळ संपला.
  • बांगलादेशने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून गाशा गुंडाळला आहे. 6 पैकी 5 सामन्यात पराभ झाल्याने पदरात फक्त दोन गुण आहेत. त्यामुळे पुढचे तीन सामने जिंकले तरी 8 गुण होतील. टॉप 4 मधील संघांचे 8 गुण कधीच झाले आहे. त्यांचा नेट रनरेटही चांगला आहे. त्यामुळे 3 सामने औपचारिकता असेल.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.