Cricket : विजयासाठी 1 चेंडूत 4 धावांची गरज, शेवटच्या बॉलवर काय झालं? पाहा व्हीडिओ

बिग बॅश लीग 2026 स्पर्धेत टीमला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. शेवटच्या बॉलवर काय झालं? कोणत्या संघाचा विजय झाला? जाणून घ्या

Cricket : विजयासाठी 1 चेंडूत 4 धावांची गरज, शेवटच्या बॉलवर काय झालं? पाहा व्हीडिओ
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: David Rogers/Getty Images
| Updated on: Jan 08, 2026 | 1:01 AM

क्रिकेट चाहत्यांना आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी 15 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या एका ट्रॉफीसाठी 16 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेला मोजून एक आठवडा बाकी आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने धमाका केला आहे. बिग बॅश लिग 2026 या स्पर्धेत युवा फलंदाजाने शेवटच्या बॉलवर टीमला सनसनाटी विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे या फलंदाजाची आता एकच चर्चा पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ओलिवर पीक याने टीमला विजयसाठी 4 धावांची गरज असताना षटकार खेचत थरारक असा विजय मिळवून दिला आहे. या शेवटच्या चेंडूच्या थराराचा व्हीडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.

आगामी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ओलिवर पीक याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी ओलीवर बीग बॅश लीग स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्सचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील 26व्या सामन्यात 6 जानेवारीला मेलबर्न रेनेगेड्ससमोर पर्थ स्कॉचर्सचं आव्हान होतं. पर्थ स्कॉर्चर्सला या सामन्यात काही खास करता आलं नाही. पर्थ स्कॉचर्सला 20 ओव्हरमध्ये 127 धावांपर्यंत पोहचता आलं. आरोन हार्डी याने केलेल्या 44 धावांच्या खेळीमुळे पर्थला या धावसंख्येपर्यंत पोहचता आलं.

पर्थ स्कॉचर्स छोट्या धावसंख्येमुळे हा सामना गमावणार, असं म्हटलं जात होतं. मात्र पर्थ स्कॉचर्सने चिवट प्रतिकार केला. पर्थने मेलबर्नच्या टीमला 72 धावांवर 12.3 ओव्हरमध्ये 5 झटके दिले. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. मात्र ओलिवर पीकने एक बाजू लावून धरली. त्यामुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. मेलबर्नचा स्कोअर 19 ओव्हरमध्ये 6 आऊट 118 असा झाला.

शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज

ओलिवरसोबत दुसऱ्या बाजूला सॅम एलियट होता. दोघांनीही आरोन हार्डीने टाकलेल्या 20 व्या षटकातील पहिल्या 5 चेंडूत 6 धावा केल्या. त्यामुळे आता विजयसाठी 4 धावांची गरज होती. स्ट्राईकवर ओलिवर होता. ओलीवरने शेवटचा चेंडू टाकला. ओलिवर थोडा बाजूला झाला आणि वेगाचा फायदा घेत कडक सिक्स लगावला. अशाप्रकारे मेलबर्नने शेवटच्या चेंडूवर 4 विकेट्सने थरारक विजय मिळवत हा क्रिकेट सामना जिंकला.

शेवटच्या चेंडूचा थरार

ओलिवर ‘मॅन ऑफ द मॅच’

दरम्यान टीमला थरारक विजय मिळवून देणारा ओलिवर मॅन ऑफ द मॅच ठरला. ओलिवरने 30 चेंडूत 44 धावांची खेळी केली आणि मेलबर्नच्या विजयाचा हिरो ठरला.