AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 : टीम इंडियाची घोषणा, रोहित-इशानसह राहुल द्रविडच्या मुलाची निवड, पहिला सामना कधी?

U19 India Tour Of Sri Lanka 2026 : अंडर 19 टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची 4 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 2 मालिकांमध्ये एकूण 5 सामने खेळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

U19 : टीम इंडियाची घोषणा, रोहित-इशानसह राहुल द्रविडच्या मुलाची निवड, पहिला सामना कधी?
Rahul Dravid Son Anvay DravidImage Credit source: PTI
| Updated on: Jun 11, 2026 | 4:59 PM
Share

भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी 19 वर्षांखालील भारतीय संघाची घोषणा केली आहे. अंडर 19 टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 2 मल्टी डे सामने खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 4 जुलैपासून एकदिवसीय मालिकेने होणार आहे. यशवर्धन सिंह चौहान भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच यशवर्धन हाच 2 मल्टी डे सामन्यांत टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. तर दोन्ही मालिकांमध्ये लक्ष्य रायचंदानी उपकर्णधार म्हणून खेळणार आहे.

राहुल द्रविडच्या मुलाला संधी

निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात माजी प्रशिक्षक आणि फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड याला संधी दिली आहे. अन्वयचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच रोहित यादव आणि इशान सूद यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र अन्वयला मल्टी डे मॅचेसमध्ये संधी देण्यात आलेली नाही.

3 सामन्यांची एकदिवसीय मालिका

एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच ठिकाणी हंबनटोटा इथे होणार आहे. सलामीचा क्रिकेट सामना हा 4 जुलै रोजी होणार आहे. दुसरा सामना 1 दिवसाच्या विश्रांतीने 6 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 9 जुलै रोजी होणार आहे.

तसेच 13 ते 16 जुलै दरम्यान पहिली मल्टी डे मॅच गॉलमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा 20 ते 23 जुलै दरम्यान कोलंबोत आयोजित करण्यात आला आहे.

भारताचा श्रीलंका दौरा, खेळाडूंची नावं जाहीर

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी अंडर 19 टीम इंडिया : यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, विनीत व्ही के, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल (विकेटकीपर), अन्वय द्रविड (विकेटकीपर), अनमोलजीत सिंग, वुटकुरी यशवीर गौड, रोहित अनिल यादव, शविन व्ही, काव्या परेश पटेल, मोहित उलवा आणि इशान सूद.

श्रीलंकेविरुद्धच्या 2 मल्टी डे मॅचेससाठी अंडर 19 टीम इंडिया : यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, पटेल कुश, मनाल चौहान, कुशाग्र ओझा, मानव कृष्णा (विकेटकीपर), आर्यन संदेश सकपाळ (विकेटकीपर), हेमचुदेशन जे, बीके किशोर, रोहित अनिल यादव, काव्या परेश पटेल, प्रियांशू सिंग, प्रणव राघवेंद्र आणि चिगुरुपती वेंकट.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार