AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयने 2025-26 साठी देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक केले जाहीर, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

बीसीसीआयने गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे या स्पर्धांची रंगत वाढली आहे. असं असताना बीसीसीआयने 2025-26 स्पर्धेच वेळापत्रक जाहीर केलं आहे. कधी कोणती स्पर्धा ते जाणून घ्या.

बीसीसीआयने 2025-26 साठी देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक केले जाहीर, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
बीसीसीआयने 2025-26 साठी देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक केले जाहीरImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 08, 2025 | 8:56 PM
Share

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचं वेळापत्रक अखेर जाहीर केलं आहे. या स्पर्धेला दुलीप ट्रॉफीपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तसेच 15 सप्टेंबरला या स्पर्धेचा शेवट होईल. दुलीप ट्रॉफी व्यतिरिक्त इराणी कप, रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, सिनियर महिला टी20 ट्रॉफी आणि सिनियर महिला एकदिवसीय कप वेळापत्रकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफी पुन्हा एकदा दोन टप्प्यात आयोजित केली जाणार आहे. त्यानुसार, पहिला टप्पा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाईल. तर दुसरा टप्पा जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित केला जाईल. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा पर्वाचा अंतिम क्रिकेट सामना वरिष्ठ महिला आंतर-झोनल मल्टी-डे स्पर्धेने संपेल. हा सामना 3 एप्रिल 2026 रोजी असेल.

पुरुषांचे 2025-26 देशांतर्गत स्पर्धांचं वेळापत्रक

  • दुलीप ट्रॉफी – 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर
  • इराणी कप – 1 ते 5 ऑक्टोबर
  • रणजी ट्रॉफी (एलिट) स्टेज 1 – 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर
  • रणजी ट्रॉफी (एलिट) स्टेज 2 – 22 जानेवारी 2026ते 1 फेब्रुवारी 2026
  • रणजी ट्रॉफी नॉकआउट फेरी – 6 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी
  • रणजी ट्रॉफी (प्लेट लीग) – 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर
  • रणजी करंडक (प्लेट फायनल) – 22 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (एलिट) – 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (प्लेट) – 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर
  • विजय हजारे ट्रॉफी (एलिट) – 24 डिसेंबर ते 18 जानेवारी
  • विजय हजारे ट्रॉफी (प्लेट) – 24 डिसेंबर ते 6 जानेवारी
  • विनू मंकड ट्रॉफी – 9 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर (एलिट), 9 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर (प्लेट)
  • कर्नल सीके नायडू ट्रॉफी (एलिट) – 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर (टप्पा 1), 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी (टप्पा 2), 21 फेब्रुवारी ते 12 मार्च (नॉकआउट)
  • कर्नल सीके नायडू ट्रॉफी (प्लेट) – 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर (टप्पा 1), 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी (टप्पा 2), 6 ते 9 फेब्रुवारी (अंतिम)
  • पुरुषांची 19 वर्षाखालील एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफी – 5 ते 11 नोव्हेंबर
  • पुरुषांची अंडर 23 राज्य अ करंडक – 9 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर (एलिट), 9 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर (प्लेट)
  • कूचबिहार ट्रॉफी – 16 नोव्हेंबर ते 20 जानेवारी (एलिट), 16 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर (प्लेट)
  • विजय मर्चंट ट्रॉफी – 7 डिसेंबर ते 28 जानेवारी (एलिट), 7 डिसेंबर ते 7 जानेवारी (प्लेट)

महिलांचे स्पर्धा आणि सामने

  • सिनियर महिला टी20 ट्रॉफी – 8 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर (एलिट), 8 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर (प्लेट)
  • वरिष्ठ महिला एकदिवसीय करंडक – 6 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी (एलिट), 6 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी (प्लेट)
  • महिला अंडर-19 टी20 ट्रॉफी – 26 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर (एलिट), 26 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर (प्लेट)
  • वरिष्ठ महिला इंटरझोनल टी20 ट्रॉफी – 4 ते 14 नोव्हेंबर
  • महिला अंडर 23 टी20  ट्रॉफी – 24 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर (एलिट), 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर (प्लेट)
  • महिला अंडर-19 एकदिवसीय करंडक – 13 डिसेंबर ते 1 जानेवारी (एलिट), 13 डिसेंबर ते 23 डिसेंबर (प्लेट)
  • महिला अंडर 15 एकदिवसीय करंडक – 2 ते 21 जानेवारी (एलिट), 2 ते  12 जानेवारी (प्लेट)
  • महिला अंडर 23 एकदिवसीय करंडक – 3 ते 22 मार्च (एलिट), 3 ते 13 मार्च (प्लेट)
  • वरिष्ठ महिला आंतर-विभागीय एकदिवसीय करंडक – 5 ते 15 मार्च
  • वरिष्ठ महिला आंतरजिल्हा बहुदिवसीय करंडक – 20  मार्च ते 3 एप्रिल

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच