India vs New Zealand: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 3 खेळाडू करणार टीम इंडियामधून डेब्यू, आयपीएलमधील कामगिरीनंतर BCCI कडून संधी

| Updated on: Nov 10, 2021 | 8:14 AM

टी विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणाही केली आहे.

1 / 5
विश्वचषकातून टीम इंडियाला लवकर एक्झिट घ्यावी लागली आहे. पण निराश न होता भारतीय संघ आगामी आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. सर्वात आधी भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध भारताने टी20 संघाची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्माला कर्णधार तर केएल राहुलला उपकर्णधार पद देण्यात आलं आहे. यावेळी विश्वचषक खेळलेल्या 8 खेळाडूंना विश्रांती दिली असून विशेष म्हणजे 3 खेळाडूंना पहिल्यांदाच टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.

2 / 5
प्रथमचं टीम इंडियातून खेळणाऱ्यांमधील पहिलं नाव म्हणजे यंदाची आय़पीएल गाजवणारा हर्षल पटेल. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. त्याने 15 सामन्यात 32 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे त्याला संधी मिळणं साहजिकच होतं. आता तो प्रथमच भारतीय संघातून खेळताना दिसेल.

3 / 5
हर्षल पाठोपाठ आणखी एक वेगवान गोलंदाज म्हणजे आवेश खान. खान याआधी नेट बोलर म्हणून टीम इंडियाबरोबर बऱ्याचदा गेला असला तरी संघात त्याचं नाव प्रथमताच असणार आहे. आवेशनेही यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करत 16 सामन्यात 24 विकेट्स पटकावल्या होत्या.

4 / 5
या दोघानंतर तिसरं नाव आहे अष्टपैलू  वेंकटेश अय्यर याचं. युएईत झालेल्या दुसऱ्या पर्वात संधी मिळालेल्या अय्यरने आपल्या फलंदाजीसह गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. त्याने 10 सामन्यात 370 धावा करत काही विकेट्सही मिळवल्या. त्यामुळे हार्दीक पंड्याच्या जागी खेळता य़ावा असा एक खेळाडू तयार कऱण्यासाठी अय्यरला संधी देण्यात आली आहे. तो प्रथमच टीम इंडिया जर्सीमध्ये दिसेल.

5 / 5
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ पुढील प्रमाणे असेल- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.