Shubman Gill याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून मोठी अपडेट, ओपनर वर्ल्ड कपला मुकणार?

Shubman Gill Injury Update : टी 20i टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल आगामी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत खेळू शकणार की नाही? जाणून घ्या बीसीसीआयने शुबमनच्या दुखापतीबाबत काय अपडेट दिली.

Shubman Gill याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून मोठी अपडेट, ओपनर वर्ल्ड कपला मुकणार?
Team India Shubman Gill
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 20, 2025 | 1:21 AM

भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे शुबमनला दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं होतं. तसेच शुबमनला एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या 2 सामन्यांना मुकावं लागलं. उभयसंघातील चौथा सामना हा धुक्यांमुळे रद्द करावा लागला होता. त्यानंतर शुबमनला दुखापतीमुळे पाचव्या टी 20i सामन्यात खेळता आलं नाही. शुबमनची दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यादरम्यानची दुखापत होण्याची दुसरी वेळ ठरली. त्यामुळे टीम इंडियाची आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी चिंता वाढली आहे.

आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी 20 डिसेंबरला भारतीय संघाची घोषणा होणार आहे. त्याआधी 19 डिसेंबरला बीसीसीआयने शुबमनच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. बीसीसीआयने शुबमनच्या दुखापतीबाबत काय सांगितलं? जाणून घेऊयात.

शुबमनच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. शुबमनला लखनौत सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे शुबमनला पाचव्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत शुबमनबाबत अपडेट दिलीय.

बीसीसीआयने काय म्हटलं?

“शुबमनला 16 डिसेंबरला लखनौमध्ये नेट्समध्ये सराव करताना पायाला दुखापत झाली होती. आता तज्ज्ञांच्या सल्ला आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून उपचार घेतल्यानंतर शुबमच्या दुखापतीत सुधार आहे”, असं बीसीसीआयने एक्स पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयनुसार, शुबमन दुखापतीतून बरा झाला आहे. मात्र शुबमन टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फिट आहे की नाही? याबाबत चाहत्यांना चिंता लागून आहे. आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन हे भारत आणि श्रीलंकेत करण्यात आलं आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

बीसीसीआय निवड समितीकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 20 डिसेंबरला भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. तसेच त्याआधी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे. त्यामुळे शुबमनला दुखापत पाहता त्याला न्यूझीलंड विरूद्धच्या दोन्ही मालिकांसाठी आणि वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणार की नाही? यासाठी आता प्रतिक्षा करावी लागणार आहे.