India vs New zealand: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, बीसीसीआयने पोस्ट केला सरावाचा VIDEO, फॅन्स मात्र भडकले

| Updated on: Oct 29, 2021 | 9:11 PM

भारताची टी20 विश्वचषकाची सुरुवात खराब झाली आहे. पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध 10 विकेट्सनी गमावला असून आता भारताच्या समोर न्यूझीलंडचे आव्हान आहे.

India vs New zealand: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, बीसीसीआयने पोस्ट केला सरावाचा VIDEO, फॅन्स मात्र भडकले
भारतीय क्रिकेटपटू
Follow us on

T20 World Cup 2021: भारतीय संघाची यंदाच्या विश्वचषकाची (T20 World Cup 2021)  सुरुवात अतिशय खराब झाली आहे. पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यामुळे आता भारतीय संघाला उर्वरीत सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. त्यात आगामी सामना रविवारी (31 ऑक्टोबर) न्यूझीलंड संघासोबत असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघ सरावात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. पण सरावाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) पोस्ट काला असता फॅन्सनी मात्र टीकेची झुंबड उठवली आहे.

तर बीसीसीआयने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये भारतीय क्रिकेटपटू समुद्रकिनाऱ्यावर वॉलीबॉल खेळत आहेत. सामन्यापूर्वी सराव म्हणून क्रिकेटपटू विविध खेळ खेळत असतात. पण सध्याची परिस्थिती पाहता विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने मात दिल्यामुळे भारतीय चाहते थोडे नाराज आहेत. त्यात सामन्यापूर्वी खेळाडू वॉलीबॉल खेळत असल्याने फॅन्सनी रागात गणिताच्या पेपरपूर्वी इंग्रजीचा अभ्यास करण्यात संघ व्यस्त असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

हाच तो VIDEO

दोन्ही संघाना विजय महत्त्वाचा

ग्रुप 2 मध्ये असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ जीवाचं रान कऱणार हे नक्की. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा विजय दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या पाकिस्तान पहिल्या स्थानी तर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानी असून भारत आणि न्यूझीलंड हे संघ विजयी आणि चांगल्या रनरेटने गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

सामना कधी?

भारत आणि न्यूझीलंड हा सामना रविवारी अर्थात 31 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता नाणेफेक होणार आहे.

हे ही वाचा

India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

West Indies vs Bangladesh: ‘UNLUCKY रस्सेल’, नॉनस्ट्राईकवर असतानाही झाला विचित्रपद्धतीने बाद, पाहा VIDEO

India vs New zealand : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धडकी, भारताचं ‘हे’ त्रिकुट उडवणार दाणादाण

(BCCI Posted Cricketers playing vollyball Video Fans got angry)