IPL स्पॉट फिक्सिंग : अंकित चव्हाणच्या बंदीबाबत BCCI चा 7 वर्षांनी मोठा निर्णय

| Updated on: Jun 16, 2021 | 11:58 AM

बीसीसीआयने (BCCI) 2013 च्या IPL मध्ये अंकित चव्हाणसह स्पाॅट फिक्सिंग प्रकरणी श्रीशांत आणि अजित चंडिला यांच्यावर आजीवन बंदी घातली होती.

IPL स्पॉट फिक्सिंग : अंकित चव्हाणच्या बंदीबाबत BCCI चा 7 वर्षांनी मोठा निर्णय
अंकित चव्हाण
Follow us on

मुंबई : डावखुरा फिरकीपटू अंकित चव्हाण (Ankit Chavan) याच्यावरील 7 वर्षांची बंदी अखेर बीसीसीआयने (BCCI) उठवली आहे. यानिर्णय़ामुळे आता अंकित चव्हाण व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. 2013 साली पार पडलेल्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (IPL 2013) अंकित चव्हाण सह स्पाॅट फिक्सिंग प्रकरणी श्रीशांत (Sreesanth) आणि अजित चंडिला (Ajit Chandila) यांच्यावर BCCI ने आजीवन बंदी घातली होती. दरम्यान सात वर्षांच्या तपासानंतर न्यायालयाने अंकित चव्हाण निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला. (BCCI Removed Ban on Cricketer Ankit Chavan For Spot Fixing which been charged in 2013 IPL Along With sreesanth)

अंकित चव्हाणवरील बंदी अखेर हटवली

 

श्रीशांतने नुकतेच केले पुनरागमन

अंकित चव्हाणसह श्रीशांत आणि अजित चंडीला यांच्यावर 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली लाईफ बॅन लावण्यात आले होते. हे तिघेही तेव्हा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होते. बीसीसीआयकडून लाईफबॅन लावण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा लाइफ बॅन बदलून सात वर्षांची केली होती. त्यानुसार श्रीशांतने मागील वर्षी सात वर्षांचा कालावधी पूर्ण करुन क्रिेकेट मैदानावर परतला होता. मात्र अंकितवरील बॅन अद्याप हटवला नसल्याने तो मागील एक वर्षापासून बीसीसीआयकडे बॅन हटवण्याची मागणी करत होता.

तरीही BCCI ने बंदी कायम ठेवली होती

सात वर्षांचा कालावधी संपल्यानंतरही अंकितवरील बंदी बीसीसीआयकडून काढण्यात येत नव्हती. त्यामुळे अखेर 2020 मध्ये अंकितने बीसीसीआयच्या बंदीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 3 मार्च 2021 मध्ये हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने BCCI लोकपालकडे पाठवले. ज्यावर अखेर निर्णय झाला असून 15 जून रोजी अंकितवरील बंदी हटवण्यात आली आहे. सात वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर बीसीसीआयने अंकितवरील बंदी हटवल्यामुळे आता तो पुन्हा एकदा मैदानात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

संबंधित बातम्या 

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

WTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(BCCI Removed Ban on Cricketer Ankit Chavan For Spot Fixing which been charged in 2013 IPL Along With sreesanth)