AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना (WTC final) 18 जूनला सुरु होणार आहे. भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

WTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?
WTC team india sqad
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 9:29 PM
Share

नवी दिल्ली: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना (WTC final) 18 जूनला सुरु होणार आहे. भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. बीसीसीआयनं फायनल साठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. इंग्लंडमधील साऊदम्पटन इंथ हा सामा होणार आहे. टीम इंडियानं जाहीर केलेल्या संघामध्ये के. एल. राहुल आणि मयांक अग्रवाल यांना संधी मिळालेली नाही त्यामुळे रोहित शर्मासोबत सलामीला शुभमन गिल येऊ शकतो. BCCI announced Team India for their 15-member squad for the WTC21 Final against New Zealand

टीम इंडियाचे 15 शिलेदार

भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.

शुभमन गिलला सलामीला खेळण्याची संधी

शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे.

शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाकडून सलामीला रोहित शर्मा, शुभमन गिल येण्याची शक्यता आहे तर त्यानंतर मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिक्य रहाणे यांच्यावर असेल. रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांचा विकेट कीपर म्हणून समावेश करण्यातत आला आहे.

आर. आश्विनच्या जोडीला रवींद्र जडेजावर फिरकीची मदार

रविचंद्रन आश्विनच्या जोडीला रवींद्र जडेजा भारतीय फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळेल. हुनमा विहारी याचा देखील भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. हनुमा विहारीचा समावेश टीम इंडिया 5 गोलंदांज किंवा एका अतिरिक्त बॅटसमन खेळवणार यावर अवलंबून असेल.

जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल.

संबंधित बातम्या:

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!

BCCI announced Team India for their 15-member squad for the WTC21 Final against New Zealand

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.