
क्रिकेट हा गोलंदाजांचा कमी आणि फलंदाजांचा खेळ झालाय, असं सर्रासपणे म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच आहे. फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांसाठी अनेक नियम आहेत. गोलंदाजांना त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतंच. मात्र दुसर्या बाजूला फलंदाजांसाठी काही नियम नाहीत का? असा प्रश्न त्यांना असलेल्या सवलती पाहता उपस्थित होतो. फलंदाजांकडून अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं जातं, मात्र त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे सामना बरोबरीचा व्हावा यासाठी आता बीसीसीआय एक्शन मोडमध्ये आली आहे. त्याचाच प्रत्यय क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमात सामन्यादरम्यान येत आहे. अंपायर्स फलंदाजांची बॅट घेऊन ती एका रिंगद्वारे तपासत आहेत. या निमित्ताने आपण बॅटच्या आकाराबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो? हे जाणून घेऊयात. रेषेच्या आतच राहून गोलंदाजांना बॉल टाकावा लागतो. रेषेबाहेर पाय गेल्यास अंपायरकडून नो बॉल दिला जातो. फलंदाजाला त्याच्या ठराविक उंचीपेक्षा बाउन्सर टाकला तर नो बॉल देण्यात येतो....