IND vs NZ: रोहित शर्माने फायनल जिंकल्यास बीसीसीआय मोठी ऑफर देणार! नेमकं काय सुरु आहे?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दिचा शेवट असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण रोहितच्या निवृत्तीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. आता अंतिम सामन्यानंतर बीसीसीआय महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ वाढवू शकते.

IND vs NZ: रोहित शर्माने फायनल जिंकल्यास बीसीसीआय मोठी ऑफर देणार! नेमकं काय सुरु आहे?
रोहित शर्मा
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 07, 2025 | 11:32 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वरिष्ठ भारतीय खेळाडू क्रिकेटला रामराम ठोकतील अशी चर्चा आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मुशफिकुर रहीम यांनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. रोहित शर्माही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यानंतर निवृत्ती घेईल अशी चर्चा आहे. पण याबाबत स्पष्ट असं काही नाही. आता वेगळंच वृत्त समोर येत आहे. निवृत्ती सोडा, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर रोहित शर्माला सरप्राईट गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. भारताने अंतिम सामना जिंकला तर रोहितचा कर्णधारपद आणखी दोन वर्षांसाठी वाढवला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा की रोहित 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत कर्णधार म्हणून राहू शकतो. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि रोहित शर्मा हे एकत्रितपणे याप्रकरणी आढावा घेतील.

रोहित शर्मा पुढील एप्रिलमध्ये 38 वर्षांचा होईल. म्हणजेच 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत 40 वर्षांचा असेल. या वयातही एकदिवसीय क्रिकेट खेळेल का? की तुकर्णधारपद सोडेल? ते त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. रोहित शर्माने गेल्या वर्षी टीम इंडियाला 2024 च्या टी20 विश्वचषकाचे जेतेपद मिळवून दिले. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी20 फॉर्मेटला निरोप दिला. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर रोहितचे कर्णधारपद काही काळासाठी राहील का? की रोहित निवृत्त होईल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर बीसीसीआय रोहितच्या भविष्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत घेऊन आणखी एक दुर्मिळ विक्रम प्रस्थापित केला आहे. रोहित हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आपल्या संघाला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप, टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धांच्या अंतिम फेरीत नेले आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराला ही कामगिरी करता आलेली नाही.