IPLचं महाभारत, बीसीसीआयने बदललं ICC चे संविधान, मोदी-पवारांनी खेळली होती मोठी खेळी
आयपीएल म्हणजे आता मोठा उत्सव झाला आहे. आयपीएल सुरू होण्याआधी महाभारत झालं होतं तुम्हाला माहिती आहे का? आयपीएल आधी सुरू झालेल्या आयसीएलला संपवण्यासाठी बीसीसीआयने आपली सर्व ताकद लावली होती. त्यावेळी बीसीसीआयने थेट आयसीसीच्या नियमांमध्ये बदल केला होता. मात्र नेमकी लढाई कशामुळे झाली होती आणि या वादाचं मुळ कारण काय जाणून घ्या.

आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. भारतामध्ये आयपीएल म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक प्रकारे उत्सवच असतो. आयपीएलची क्रेज सर्वांनाच माहित आहे. आयपीएलही अनेक खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची एक शिडी झाली आहे. टीम इंडियालाही याच आयपीएलमधून जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्यासारखे तगडे खेळाडू मिळाले आहेत. संपूर्ण जगभरात आयपीएलची चर्चा होते ती सामना दरम्यान होणाऱ्या करोडोंच्या उलाढालीमुळे. पण, तुम्हाला माहित आहे का की आयपीएल नेमकी कशी आणि का सुरू झाली? आयपीएल सुरू होण्याआधी झी कंपनीचे मालक सुभाष चंद्रा आणि बीसीसीआयमध्ये काय महाभारत झालं होतं? त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार होते. त्यावेळी नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या सविस्तर. 2003 मध्ये इंग्लंडमध्ये टी – 20 क्रिकेटला सुरूवात झाली. जगभरात टी-20 क्रिकेटच लोण पसरलं होतं. मात्र, भारतात त्याची म्हणावी तशी काही क्रेझ नव्हती. या काळातच झी कंपनीचे मालक सुभाष चंद्रा यांनी 2003, 2005 आणि 2006 मध्ये स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंगच्या हक्कासाठी बिडिंग केलं. मात्र, कमी अनुभव...