
अँडरसन तेंडुलकर कसोटी ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडने कमबॅक केलं. शुबमन गिल आणि ऋषभ पंत जोडी फोडल्यानंतर इतर खेळाडूंना स्वस्तात तंबूत पाठवला. भारताचा पहिल्या दिवशी डाव 471 धावांवर आटोपला. जोश टंगने प्रसिद्ध कृष्णाची विकेट घेतली आणि भारताचा डाव संपुष्टात आला. भारताची शेवटची विकेट पडल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचं विचित्र सेलीब्रेशन कॅमेऱ्यात चित्रित झालं. बेन स्टोक्सने काही तरी खाण्याचा अभिनय केला. टंगकडे इशारा केल्यानंतर कर्णधाराने गोलंदाजाला टाळी दिली. इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडने एक्सवर या सेलीब्रेशनचा अर्थ स्पष्ट केला. त्याने सांगितलं की, ‘तळाच्या फलंदाजांना बाद करून फलंदाजीला उद्ध्वस्त करणं.’ टंगने तळाच्या फलंदाजांना पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसी झटपट बाद करण्यात मोलाची भूमिका बजावली.
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने 41 धावांवर 7 गडी गमावले. पहिल्या दिवशी भारताने 3 विकेट गमवून 359 धावा केल्या होत्या. या धावांचा पुढे खेळताना चौथ्या दिवशी भारताचा डाव 471 धावांवर आटोपला. जोश टंगन 20 षटकात 86 धावा देत 4 गडी बाद केले. तर बेन स्टोक्सने 20 षटकात 66 धावा देत 4 गडी बाद केले. तर शोएब बशीर आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी एक गडी बाद केला.
What was that gesture from Ben Stokes to Josh Tongue? 😅 pic.twitter.com/7HBIs5BlFF
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 21, 2025
दुसरीकडे, मायकल वॉनने बेन स्टोक्सने घेतलेल्या निर्णयावर बोट दाखवलं. त्याने सांगितलं की, मी लीड्सचा जुन्या पारंपरिक विचारांचा व्यक्ती आहे. जेव्हा कडक ऊन असतं आणि पाऊस नसतो. तेव्हा तुम्ही फलंदाजी करता. मी आश्चर्यचकीत आहे की स्टोक्सने सांगितलं की गोलंदाजी करेन. परंपरा आता महत्त्वाच्या नाहीत. तुम्हाला काही वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींच्या आधारावर नाही तर त्या क्षणानुसार निर्णय घ्यावा लागेल. इंग्लंडची ताकद फलंदाजीत असताना असा निर्णय घेतल्याने त्याने आश्चर्य व्यक्त केलं.
दरम्यान, झॅक क्राउले स्वस्तात बाद झाल्यानंतर बेन डकेट आणि ओली पोपने डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तसेच दोघंही अर्धशतकाच्या वेशीवर आहेत. भारताने डकेटच्या दोन झेल सोडले. त्याने या संधीचं सोनं केलं.