INDvsAUS | टीम इंडियाचे 5 खेळाडू पहिल्या कसोटीतून ‘आऊट’, नक्की कारण काय?

| Updated on: Feb 08, 2023 | 5:55 PM

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

INDvsAUS | टीम इंडियाचे 5 खेळाडू पहिल्या कसोटीतून आऊट, नक्की कारण काय?
Follow us on

नागपूर : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेला गुरुवारी 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या सीरिजमधील पहिली मॅच ही नागपूरमधील विदर्भ क्रिकेट स्टेडियमच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या पहिल्याच सामन्यातून टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कॅप्टन रोहित शर्मा या 5 जणांचा विचार करणार नाही. या खेळाडूंमध्ये नागपूरमधील खेळाडूचाही समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडू टेन्शनमध्ये आहेत.

टीम इंडियाच्या या 5 खेळाडूंमध्ये लोकल बॉय उमेश यादव, चायनामॅन बॉलर कुलदीप यादव, विकेटकीपर बॅट्समन इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट या पाच जणांचा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात येणार आहे. या पहिल्या कसोटीत आर अश्विन हा स्पिन बॉलिंगचं नेतृत्व करेल. त्यामुळे कुलदीपला बाहेर बसावं लागणार आहे.

पहिल्या कसोटीत कॅप्टन रोहित आणि कोच राहुल द्रविड वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या दोघांना संधी देतील. त्यामुळे जयदेव आणि उमेश या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जातंय.

हे सुद्धा वाचा

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तारीख आणि ठिकाण जाहीर केलं आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज जिंकणं महत्त्वाचं आहे. यासाठी टीम इंडियाला ही मालिका 4-0, 3-0, 3-1 किंवा 2-0 अशा फरकााने जिंकावी लागेल.

नागपुरातील आकडेवारी

टीम इंडियाने आतापर्यंत नागपूरमध्ये 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. 1 सामना ड्रा राहिला तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

टीम इंडियाची संभावित प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुबमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.