
लखनौ सुपरजायंट्स फ्रेंचायझी 2021 मध्ये स्थापन झाली आणि 2022 आयपीएलमध्ये पहिल्यांदा स्थान मिळवलं. आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्सने तीन पर्वात खेळली आहे. पण मागच्या पर्व लखनौ सुपर जायंट्ससाठी वाईट ठरलं. पहिल्यांदा चढता आलेख असताना नंतर घसरण झाली. प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. त्याचबरोबर हैदराबादकडून मिळालेल्या पराभवानंतर नेटरनरेटचं बिघडला. त्यामुळे संघ मालक संजीव गोयंका यांना राग अनावर झाल्याचं चित्र दिसलं. आता नवं पर्व असून संघ बांधणीसाठी फ्रेंचायझी पुढे सरसावली आहे. यासाठी संघाची खलबलंही सुरु आहेत. कोणाला रिलीज करायचं आणि कोणाला संघात ठेवायचं यासाठी चर्चांचे फड रंगले आहेत. दरम्यान, सोमवारी केएल राहुल आणि संघ मालक संजीव गोयंका यांची भेट झाली. या भेटीतून बरेच अर्थ काढले जात आहे. काही जणांच्या मते केएल राहुलला रिलीज केलं जाईल. तर काही जणांच्या मते केएल राहुल संघासोबतच राहील. अशी द्विधा मत असताना एक बातमी समोर आली आहे.संजीव गोयंका बुधवारी महत्त्वाची घोषमा करणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.
संजीव गोयंका यांची पत्रकार परिषद असल्याने महत्त्वाची घडामोड घडणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागून आहे. या पत्रकार परिषदेत केएल राहुलचा निर्णय होऊ शकतो. केएल राहुल संघात राहील की जाईल हे स्पष्ट होऊ शकतं. कारण केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघ सोडणार असल्याने एलएसजीचे मालक आता त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे क्रीडारसिकांसोबत आयपीएल फ्रेंचायझींचा नजरा या पत्रकार परिषदेवर लागून आहेत.
LSG owner Sanjiv Goenka will conduct a Press conference tomorrow to make announcements about his IPL franchise. [RevSportz] pic.twitter.com/Pj8ttmmftY
— Johns. (@CricCrazyJohns) August 27, 2024
लखनौ सुपर जायंट्सने संघ सोडल्यास काही फ्रँचायझी राहुलला विकत घेण्यासाठी पुढे सरसावतील. विशेषत: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायझी नवीन कर्णधार आणि यष्टिरक्षक शोधत आहे. त्यांना केएल राहुलला खरेदी करण्यात खूप रस आहे. विराट कोहलीसोबत केएल राहुलची टुनिंगही जमेल. त्यामुळे मेगा लिलावात राहुल दिसल्यास त्याला आरसीबी खरेदी करेल हे जवळपास निश्चित आहे.