BAN vs IND : हा कुणाचा जावई? टीम इंडियाच्या क्रिकेटरच्या फ्लॉप कामगिरीनंतर भाजप नेत्याचा प्रश्न

| Updated on: Dec 25, 2022 | 6:22 PM

"तर ज्याला टीममधून बाहेर असायला हवं, तो कॅप्टन झालाय", असं म्हणत एकाने आपला संताप व्यक्त केलाय.

BAN vs IND : हा कुणाचा जावई? टीम इंडियाच्या क्रिकेटरच्या फ्लॉप कामगिरीनंतर भाजप नेत्याचा प्रश्न
team india
Image Credit source: बीसीसीआय
Follow us on

मुंबई : टीम इंडियाने (Indian Cricket Team) बांगलदेशवर 2 सामन्यांच्या कसोटी (BAN vs IND Test Series 2022) मालिकेत 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला. आर आश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shereyas Iyer) या जोडीने निर्णायक भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मात्र या संपूर्ण मालिकेत पुन्हा एकदा हंगामी कर्णधार केएल राहुलच्या (K L Rahul) कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. कसोटी मालिकेत फ्लॉप ठरल्याने केएलवर क्रिकेट चाहत्यांकडून टीका केली जात होती. मात्र आता तर थेट भाजप नेत्यानेच केएल राहुलच्या कामगिरीवर ट्विट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. (bjp leader ramesh solanki question to k l rahul about his flop performence ban vs ind test series)

भाजप नेत्याचं ट्विट

भाजप नेते रमेश सोलंकी यांनी ट्विट करत केएल राहुलला संघात संधी देण्यावरुन प्रश्न उपस्थित केलाय. “हा केएल राहुल कुणाला जावई आहे?”, असं ट्विट सोलंकी यांनी केलंय. केएल गेल्या काही काळापासून सातत्याने फ्लॉप ठरतोय. केएलला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्यानंतरही त्याची संघात निवड होतेय. यावरुन सोलंकी यांनी हा कुणाचा जावई आहे, असा उपरोधिक स्वरात प्रश्न विचारलाय.

हे सुद्धा वाचा


#TestCricket

ट्विटवर नेटकरी काय म्हणाले?

सोलंकी यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “राहुलच्या नेतृत्वात कसोटी मालिका जिंकलो. मात्र त्यानंतरही प्रश्न उपस्थित केले जात आहे”, असं एका यूझर्सचं म्हणंन आहे. “तर ज्याला टीममधून बाहेर असायला हवं, तो कॅप्टन झालाय”, असं म्हणत एकाने आपला संताप व्यक्त केलाय.

केएलची बांगलादेश कसोटी मालिकेतील कामगिरी

केएलने बांगलादेश विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यातील 4 डावांमध्ये अनुक्रमे 10, 2, 22 आणि 23 अशा एकूण फक्त 57 धावाच केल्या आहेत. त्यामुळे केएल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.

दरम्यान बांगलादेश दौरा संपला आहे. यानंतर टीम इंडियाची गाठ श्रीलंकेसोबत पडणार आहे. श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया नववर्षाची सुरुवात ही श्रीलंकेविरुद्ध 3 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेने करणार आहे. तर यानंतर एकदिवसीय मालिकेचंही आयोजन करण्यात आलंय.