Resign : मंत्रि‍पदाची शपथ घेतलेल्या भाजप आमदाराला या पदाचा द्यावा लागणार राजीनामा

Bjp Minister : महायुती सरकारचा रविवारी 15 डिसेंबर रोजी नागपुरातील राजभवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आता मंत्रि‍पदाची शपथ घेतलेल्या भाजपच्या एका आमदाराला मोठ्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

Resign : मंत्रि‍पदाची शपथ घेतलेल्या भाजप आमदाराला या पदाचा द्यावा लागणार राजीनामा
maharashtra government cm dcm and minister
Image Credit source: DGIPR X Account
| Updated on: Dec 16, 2024 | 6:46 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. राज्यात प्रचंड बहुमतानी महायुती सत्तेत आली. त्यानंतर काही दिवसांनी 5 डिसेंबरला देंवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 10 दिवसांनी 15 डिसेंबरला नागपुरात टीम फडणवीसचा महाशपथविधी सोहळा पार पडला. शपथविधी सोहळ्यात भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकूण 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापैकी 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या एका मुंबईकर आमदाराला मोठ्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. भाजपचे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रि‍पदामुळे बीसीसीआय खजिनदारपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शेलारांना बीसीसीआयच्या ऑफीस ऑफ प्रॉफीट नियमानुसार हे पद सोडावं लागणार आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयच्या खजिनदारपदी कुणाची नियुक्ती होणार? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

एमसीए सदस्य ते बीसीसीआय खजिनदार

आशिष शेलार यांनी राजकारणासह क्रिकेटमध्येही जोरदार फटकेबाजी केलीय. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य ते जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयचे खजीनदार अशी त्यांनी मजल मारली. शेलाराांची जून 2015 साली एमसीए सदस्य म्हणून निवडून गेले. शेलार यांनी त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या संचालकपदाची जबाबजारी सार्थपणे पार पाडली. दरम्यानच्या काळात ते राजस्थान स्पोर्ट्स क्लबे उपाध्यक्ष राहिले. शेलारांची जानेवारी 2021 साली एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाली.

शेलारांनी राजकारणासह क्रिकेटमधील जबाबदारी सार्थपणे पार पाडली. त्यानंतर शेलार यांची 18 ऑक्टोबर 2022 रोजी बीसीसीआय खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली. मात्र आता त्यांना मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

देवजीत सैकिया कार्यवाहक सचिव

दरम्यान जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी बीसीसीआय सचिव पदाचा राजीनामा दिला.त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजीत सैकिया यांची कार्यवाहक सचिवपदी नियुक्ती केली आहे.