Dwayne Bravo New Record : ड्वेन ब्राव्होचा ऐतिहासिक विक्रम, दिग्गज गोलंदाजांनाही मागे टाकलं, कोणता रेकॉर्ड केलाय? जाणून घ्या…

| Updated on: Aug 12, 2022 | 8:29 AM

Dwayne Bravo New Record : ड्वेन ब्राव्हो आता जागतिक क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ अफगाणिस्तानच्या राशिद खानचा क्रमांक लागतो. यानं सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 466 विकेट्स घेतल्या आहेत.

Dwayne Bravo New Record : ड्वेन ब्राव्होचा ऐतिहासिक विक्रम, दिग्गज गोलंदाजांनाही मागे टाकलं, कोणता रेकॉर्ड केलाय? जाणून घ्या...
ड्वेन ब्राव्होचा ऐतिहासिक विक्रम
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) जगभरातील T20 लीगमध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो. वयाच्या 38 व्या वर्षीही या खेळाडूच्या क्रिकेट खेळण्याच्या आवडीमध्ये कोणतीही कमतरता नाही. टी-20 (T-20) लीग कोणतीही असो, ब्राव्हो तुम्हाला तिथे खेळताना नक्कीच दिसेल. यामुळेच त्याने या फॉरमॅटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. गुरुवारी रात्रीही त्याने टी-20 क्रिकेटमध्ये अशीच ऐतिहासिक कामगिरी (Dwayne Bravo New Record )केली आहे. द हंड्रेड स्पर्धेत खेळताना त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 600 बळी पूर्ण केले. हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला 500 बळींचा टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे त्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्याचे फॅन्स देखील खूश आहेत.

हायलाईट्स

  1. सामन्याआधी ब्राव्होच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 598 विकेट्स होत्या
  2. त्याने 20 चेंडूत 29 धावांत दोन बळी घेतले
  3. द हंड्रेड स्पर्धेत खेळताना त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 600 बळी पूर्ण
  4. रिले रॉसौला LBW बाद करून आपला 599 वा बळी बनवला
  5. सॅम कुरनला गोलंदाजी देऊन 600 बळी पूर्ण केले
  6. ड्वेन ब्राव्हो आता जागतिक क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा एकमेव गोलंदाज आहे.
  7. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 466 विकेट्स घेतल्या आहेत.

एकमेव गोलंदाज

नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळताना ड्वेन ब्राव्होने ओव्हल इन्व्हिन्सिबल्सविरुद्ध ही कामगिरी केली. या सामन्यापूर्वी ब्राव्होच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 598 विकेट्स होत्या. त्याने 20 चेंडूत 29 धावांत दोन बळी घेतले. त्याने रिले रॉसौला LBW बाद करून आपला 599 वा बळी बनवला. तर सॅम कुरनला गोलंदाजी देऊन 600 बळी पूर्ण केले. ड्वेन ब्राव्हो आता जागतिक क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ अफगाणिस्तानच्या राशिद खानचा क्रमांक लागतो, ज्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 466 विकेट्स घेतल्या आहेत.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज-

  1. ड्वेन ब्राव्हो – 600
  2. राशिद खान – 466
  3. सुनील नरेन – 460
  4. इम्रान ताहिर – 451
  5. शकील अल हसन – 418

नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि ओव्हल इन्व्हिन्सिबल्स विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे तर ड्वेन ब्राव्होच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतरही त्याचा संघ 3 विकेट्सने पराभूत झाला. प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅडम लीथच्या 33 चेंडूत 79 धावांच्या जोरावर नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाने 157 धावा केल्या. सॅम कुरनच्या झंझावाती खेळीच्या जोरावर ओव्हलने ही धावसंख्या गाठली.कुरनने 39 चेंडूत 60 धावा केल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, ब्राव्होच्या विक्रमाची चहुकडे चर्चा आहे.