
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या काही तासात या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हा संघ आमनेसामने येणार आहे. त्यामुळे जेतेपदाची माळ कोणच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे. दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत फक्त एकच आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 दक्षिण अफ्रिकेने आपल्या नावावर केली आहे. याशिवाय आयसीसी स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेच्या पदरी निराशाच पडली आहे. मग ते वनडे वर्ल्ड कप असो की टी20 वर्ल्डकप, दक्षिण अफ्रिकेला आयसीसी चषकाचं स्वप्न काही पूर्ण करता आलेलं नाही. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रुपाने दक्षिण अफ्रिकेकडे संधी आहे. दक्षिण अफ्रिकेचं हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलियन संघ पाच प्रश्नांची उत्तरं शोधण्यात अपयशी ठरली तर पराभवाचं तोंड पाहावं लागू शकतं. चला जाणून घेऊयात ऑस्ट्रेलियासमोर कोणती पाच आव्हान आहेत ती..
मार्नस लाबुशेनचा फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरला आहे. मधल्या फळीत खेळणारा मार्नस गेल्या काही सामन्यात सुमार ठरला आहे. 2023 एशेज मालिकेनंतर एकही शतक ठोकू शकलेला नाही. मागच्या दोन वर्षात त्याच्या फलंदाजीची सरासरी 28.33 टक्के आहे. काउंटी क्रिकेट खेळूनही फार काही बदल झालेला नाही. ग्लॅमरगनकडून खेळताना तीन डावात फक्त 0, 4, आणि 23 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये ठेवायचं की नाही इथपासून प्रश्न आहे.
दुसरा प्रश्न आहे कॅमरून ग्रीनचा.. अष्टपैलू कॅमरून ग्रीनबाबत पॅट कमिन्सपुढे मोठा पेच आहे. ग्रीन सध्या फॉर्मात आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळवू शकतो. काउंटी क्रिकेटमध्ये ग्लूस्टरशायरकडून खेळताना त्याने 9 डावात 66.71 च्या सरासरीने धावा केल्या. त्याने 128,67*, 118* आणि 25 धावा केल्या आहेत. पण पाठदुखीच्या त्रासातून आताच बरा झाला आहे. त्यामुळे गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे गोलंदाजीचा एक पर्याय कमी होईल.
तिसरा प्रश्न येतो ते ओपनिंगचा.. डेविड वॉर्नर रिटायर झाल्याने उस्मान ख्वाजासोबत ओपनिंगला कोण उतरणार असा प्रश्न आहे. ट्रेव्हिस हेडने श्रीलंका दौऱ्यात ओपनिंग केली होती. पण इंग्लंडमधील स्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे सॅम कोनस्टास चांगला पर्याय ठरू शकतो. पण त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे एकच पर्याय उरतो तो म्हणजे मार्नस लाबुशेन.. पण त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.
विकेटकीपर बॅट्समन म्हणूक कोण? इंग्लिस की कॅरी..! या दोघांपैकी कोणाला प्लेइंग 11 मध्ये संधी द्यायची असा प्रश्न आहे. एलेक्स कॅरी विकेटकीपिंग करेल. पण इंग्लिसला फलंदाज म्हणून घेतलं तर प्लेइंग इलेव्हनमध्ये गडबड होईल. आघाडीच्या फलंदाजांना धावा करण्यास अडचण येत असते तेव्हा…
स्कॉट बोलँड आणि जोश हेझलवूड यांच्यापैकी एकाची निवड करणंही कठीण जाणार आहे. मिचेल स्टार्कनंतर तिसरा गोलंदाज कोण? असा प्रश्न आहे. जोश हेझलवूडने आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. यासह हेझलवूडला लॉर्डमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. पण स्कॉट बोलँडही फॉर्मात आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत हेझलवूड जखमी झाल्यानंतर बोलँडला संधी मिळाली होती. त्याने तीन कसोटीत 21 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे एकाची निवड करणं डोकेदुखी ठरणार आहे.