रोहित शर्मा शिव्या देतो आणि…! कर्णधार शुबमन गिलच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा कस लागणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत कर्णधार शुबमन गिल याने मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्मा शिव्या देतो आणि...! कर्णधार शुबमन गिलच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शुबमन गिल
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2025 | 9:30 PM

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान आहे. कारण मागच्या 17 वर्षात टीम इंडियाला ही मालिका जिंकता आलेली नाही. राहुल द्रविडच्या नेतृत्वात 2007 मध्ये भारताने मालिका जिंकली होती. त्यानंतर विजयाची चव काही चाखता आली नाही. दुसरीकडे, या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची उणीव भासणार आहे. कारण या दोघांनी मागच्या महिन्यात कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळताना टीम इंडियाला अनुभवाची उणीव जाणवणार आहे. दुसरीकडे, शुबमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून मिळणाऱ्या शिकवणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. शुबमन गिलने स्काय स्पोर्ट्सला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत विधान केलं.

शुबमन गिल रोहित शर्माबाबत म्हणाला की, ‘असं वाटतं की रोहित भाई खूप आक्रमक नाही पण तो सर्वात जास्त आक्रमक आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली संवाद खूप स्पष्ट असायचा. मालिकेपूर्वी, मालिका सुरु असताना आणि मालिका संपल्यानंतर काही खेळाडूंशी थेट चर्चा करायचा आणि सांगायचा.’ शुबमन गिलने रोहित शर्माबाबत सांगितलं की, ‘रोहित शर्माने ज्या पद्धतीचं वातावरण बनवलं होतं. अशा स्थितीत त्याने शिव्या जरी दिल्या तरी मनाला लागत नव्हत्या. ते त्यांचं व्यक्तित्व आहे. ती त्यांची स्पेशालिटी आहे आणि दृढ झाली आहे. त्याने भलेही एखादी गोष्ट कठोरपणे सांगितली तरी त्याच्या मनात काही नसतं. टीमच्या हिशेबाने तो सांगत असतो.’

शुबमन गिलने विराट कोहलीबाबतही आपलं मन मोकळं केलं. ‘जेव्हा मी विराट भाईच्या नेतृत्वाखाली खेळायचो, तेव्हा मला वाटते की त्याचे विचार आणि कसोटी सामन्यादरम्यानचे त्याचे विचार मला खूप आवडायचे. सामन्यादरम्यान, जर एखादी योजना यशस्वी झाली नाही, तर तो लगेच दुसरी योजना बनवतो आणि गोलंदाजाला काय करायचे आहे ते सांगतो.’, असं शुबमन गिलने पुढे सांगितलं. शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस पहिल्याच दौऱ्यात लागणार आहे.