IND vs ENG : इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत शार्दुल ठाकुरची जागा पक्की! केलं असं की…
भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी इंट्रा स्क्वॉड सामना सुरु आहे. या सामन्यात सरफराज खाननंतर शार्दुल ठाकुरने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीमुळे त्याचं प्लेइंग 11 मधील स्थान पक्कं वाटत आहे.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागून आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाची लिटमस टेस्ट होत आहे. भारत ए आणि भारत या संघात दोन हात होत आहेत. यामुळे प्लेइंग 11 निवडणं कर्णधार शुबमन गिल याला सोपं जाणार आहे. चार दिवसीय इंट्रा स्क्वॉड सामन्यात इंडिया ए साठी सरफराज खानने शतकी खेळी केली. त्यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकुरने फलंदाजीची चमक दाखवली. यामुळे पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 मध्ये त्याची निवड पक्की समजली जात आहे. इंडिया ए साठी शार्दुल ठाकुरने नाबाद 122 धावांची खेळी केली. शार्दुल ठाकुरचा इंग्लंडमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्याच्या या खेळीमुळे त्याचं प्लेइंग 11 मधील स्थान पक्कं समजलं जात आहे. शार्दुल ठाकूरने 2023 पासून भारतीय संघासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. दरम्यान, इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर अतिरिक्त फलंदाजीची खोली आवश्यक आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूरची ही खेळी संघासाठी दिलासादायक बातमी आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकुर फलंदाजीला आला होता. त्याने 10 चेंडूत 19 धावा करून नाबाद राहीला. त्यानंतर शेवटच्या दिवशी त्याने डाव पुढे नेत गोलंदाजांची धुलाई केली. नाबाद शतकी खेळीनंतर त्याने सिद्ध केलं की, फक्त गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. या सामन्यात इंडिया ए कडून सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. तर अभिमन्यू ईश्वरन 39 धावा करून बाद झाला. 20 जून रोजी हेडिंग्ले येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात नितीश रेड्डी आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी शुबमन गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.
साई सुदर्शनला या सामन्यात दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा शून्यावर बाद झाला. त्यानंतर त्याने त्याने 38 धावांची खेळी केली. दुसरीकडे इंडियासाठी कर्णधार शुबमन गिल, केएल राहुल आणि रवीद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारतीय संघासाठी एक कठीण परीक्षा असेल. 2007 पासून भारताने या देशात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
