AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईला येऊन भीक मागतात… IND-PAK मॅचपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, UAE चा व्हिसाच मिळेना

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने आज आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध खेळला. आता 23 फेब्रुवारी रोजी त्यांचा भारतासोबत सामना होणार आहे.

दुबईला येऊन भीक मागतात... IND-PAK मॅचपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, UAE चा व्हिसाच मिळेना
| Updated on: Feb 19, 2025 | 9:56 PM
Share

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने आज आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध खेळला. मात्र या सामन्यात स्टेडियम खाली दिसले, आपल्याच देशात सुरू असलेल्या या सामनाकडे पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमींनी पाठ फिरवली. सामना पाहाण्यासाठी प्रेक्षकच न आल्यानं पाकिस्तान सरकार सध्या जबरदस्त ट्रोल होत आहे. मात्र सध्या सर्व जगाचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे येत्या 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणार्‍या भारत -पाकिस्तानच्या हाय होल्टेज सामन्याकडे.

पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी आपल्याच देशात झालेल्या पहिल्या सामन्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं, स्टेडियम पूर्ण पणे रिकामं होतं. यावरून आता पाकिस्तानचं सरकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलं आहे. दुसरीकडे मात्र येत्या 23 तारखेला पाकिस्तानचा भारताविरूद्ध सामना आहे, या सामन्याचं तिकीट आणि युएईचा व्हिसा मिळवण्यासाठी पाकिस्तानी प्रयत्न करत आहेत.त्यांना भारताविरोधात होणारा पाकिस्तानचा हा क्रिकेट सामना पाहाण्यासाठी दुबईला जायचं आहे, मात्र त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री सुरू झाली, त्यानंतर अवघ्या तासाभरताच सर्व तिकीटं संपले. काही जणांना तिकीट मिळालं, मात्र अनेकांना हात चोळत बसावं लागलं.

बस समस्या येवढ्यावरच थांबली नाही तर आता ज्यांना तिकीट मिळालं आहे, त्यांना UAE चा व्हिसा मिळवण्यात अडचण येत आहे, त्यांना व्हिसाच मिळत नाहीये. याबाबत बोलताना काही पाकिस्तानी नागरिकांनी सांगितलं की सकाळी व्हिसा साठी अर्ज केला होता, मात्र संध्याकाळी काहीही कारण न देता अर्ज रिजेक्ट करण्यात आला. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमधून व्हिसासाठी अर्ज केला जात आहे, मात्र कोणालाही टूरिस्ट व्हिसा मिळत नाहीये.एका रिपोर्टनुसार UAE च्या अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानातून दुबईला येणाऱ्या नागरिकांची कडक तपासणी सुरू आहे. कारण त्यातील अनेकांवर असा आरोप आहे की, ते इथे दुबईत येऊन भीक मागतात, तसेच त्यांच्यामुळे देशातील क्राइम रेट वाढला आहे. त्यामुळे आता युएईकडून पाकिस्तानी नागरिकांच्या टूरिस्ट व्हिसावर बंधन घालण्यात आली आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.