
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने आज आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध खेळला. मात्र या सामन्यात स्टेडियम खाली दिसले, आपल्याच देशात सुरू असलेल्या या सामनाकडे पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमींनी पाठ फिरवली. सामना पाहाण्यासाठी प्रेक्षकच न आल्यानं पाकिस्तान सरकार सध्या जबरदस्त ट्रोल होत आहे. मात्र सध्या सर्व जगाचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे येत्या 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणार्या भारत -पाकिस्तानच्या हाय होल्टेज सामन्याकडे.
पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी आपल्याच देशात झालेल्या पहिल्या सामन्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं, स्टेडियम पूर्ण पणे रिकामं होतं. यावरून आता पाकिस्तानचं सरकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलं आहे. दुसरीकडे मात्र येत्या 23 तारखेला पाकिस्तानचा भारताविरूद्ध सामना आहे, या सामन्याचं तिकीट आणि युएईचा व्हिसा मिळवण्यासाठी पाकिस्तानी प्रयत्न करत आहेत.त्यांना भारताविरोधात होणारा पाकिस्तानचा हा क्रिकेट सामना पाहाण्यासाठी दुबईला जायचं आहे, मात्र त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री सुरू झाली, त्यानंतर अवघ्या तासाभरताच सर्व तिकीटं संपले. काही जणांना तिकीट मिळालं, मात्र अनेकांना हात चोळत बसावं लागलं.
बस समस्या येवढ्यावरच थांबली नाही तर आता ज्यांना तिकीट मिळालं आहे, त्यांना UAE चा व्हिसा मिळवण्यात अडचण येत आहे, त्यांना व्हिसाच मिळत नाहीये. याबाबत बोलताना काही पाकिस्तानी नागरिकांनी सांगितलं की सकाळी व्हिसा साठी अर्ज केला होता, मात्र संध्याकाळी काहीही कारण न देता अर्ज रिजेक्ट करण्यात आला. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमधून व्हिसासाठी अर्ज केला जात आहे, मात्र कोणालाही टूरिस्ट व्हिसा मिळत नाहीये.एका रिपोर्टनुसार UAE च्या अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानातून दुबईला येणाऱ्या नागरिकांची कडक तपासणी सुरू आहे. कारण त्यातील अनेकांवर असा आरोप आहे की, ते इथे दुबईत येऊन भीक मागतात, तसेच त्यांच्यामुळे देशातील क्राइम रेट वाढला आहे. त्यामुळे आता युएईकडून पाकिस्तानी नागरिकांच्या टूरिस्ट व्हिसावर बंधन घालण्यात आली आहेत.