Mumbai Indians | मुंबई इंडियन्स टीमकडून पाकिस्तानच्या 2 खेळाडूंना संधी, कसं झालं शक्य जाणून घ्या

| Updated on: Mar 21, 2023 | 6:29 PM

आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्सने पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना आपल्या संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Indians | मुंबई इंडियन्स टीमकडून पाकिस्तानच्या 2 खेळाडूंना संधी, कसं झालं शक्य जाणून घ्या
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या पर्वाला सुरू व्हायला काहीच दिवस बाकी आहे. 31 मार्चला पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुप किंग्ज यांच्यात होणार आहे. अशातच आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्सने पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना आपल्या संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमधील सघांमध्ये खेळणार असल्याने सगळीकडे याची जोरदार चर्चा आहे. चाहत्यांनाही धक्का बसला आहे की पहिल्या पर्वानंतर आतापर्यंत पाकिस्तानचे खेळाडू खेळले नाहीत. आता असं काय झालं की फ्रँचायझीने त्यांना सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू हम्माद आझम आणि एहसान आदिल यांचा इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघात प्रवेश करण्यात आला आहे. याबाबत मुंबई इंडिअन्सच्या सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. मात्र आयपीएलमध्ये नाहीतर यंदा जुलैमध्ये अमेरिकेमध्ये मेजर क्रिकेट लीग खेळवली जाणार आहे. या लीगमध्ये आयपीएलमधी चार फ्रँचायझीने आपले संघ उतरवले आहेत.

यामधील मुंबई इंडिअन्स संघाने हम्माद आझम आणि एहसान आदिल यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. हम्माद आझमने 2011 ते 2015 पर्यंत पाकिस्तानसाठी 11 एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळले. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याचबरोबर एहसानने पाकिस्तानकडून तीन कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. एहसान आयसीसी विश्वचषक 2015 मध्ये पाकिस्तान संघामध्ये होता.

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेबद्दल माहिती

MLC म्हणजेच मेजर लीग क्रिकेट ही अमेरिकेतील पहिली क्रिकेट स्पर्धा आहे. अमेरिकेत 13 ते 30 जुलै यादरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत सहा फ्रँचायझी असून त्यातील चार आयपीएलमधील आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने न्यूयॉर्क संघ, शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने लॉस एंजेलिसचा संघ, चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रेंचायजीच नाव आहे टेक्सास आणि दिल्ली कॅपिटल्सच्या टीमच नाव आहे सीटल ओर्कस.