CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?
Chennai Super Kings vs Delhi Capitals IPL 2026 Live Scorecard : चेन्नई सुपर किंग्स 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेतील चौथा सामना घरच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे चेन्नई घरच्या मैदानात विजयी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Chennai Super Kings vs Delhi Capitals
Image Credit source: PTI
आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघापैकी 1 असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला 19 व्या मोसमात (IPL 2026) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत आण ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नईने आपल्या मोहिमेतील सलग आणि एकूण 3 सामने गमावले आहेत. आता चेन्नई या हंगामातील चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध भिडणार आहे. दिल्लीचाही हा चौथा सामना असणार आहे. दिल्लीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीला एका आणि शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे दिल्ली कमबॅक करणार की चेन्नई चौथ्या सामन्यात विजयाचं खातं उघडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Follow Us