ICC WTC Final : रोहित शर्मा-विराट कोहली बसमधून फिरतात, चेतेश्वर पुजाराला विशेष कार, असं का?

| Updated on: Jun 02, 2023 | 3:13 PM

ICC WTC Final : चेतेश्वर पुजाराला मिळालेली स्पेशल कार चर्चेत विषय बनलीय. टीम इंडियाचे खेळाडू बसमधून फिरतात आणि चेतेश्वर पुजारा कारमधून येतो, असं का? हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.

ICC WTC Final : रोहित शर्मा-विराट कोहली बसमधून फिरतात, चेतेश्वर पुजाराला विशेष कार, असं का?
Virat kohli-cheteshwar pujara
Image Credit source: AFP
Follow us on

लंडन : IPL 2023 नंतर टीम इंडियाचे खेळाडू आता इंग्लंडमध्ये दाखल झालेत. 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्स फायनलची जोरदार तयारी करतायत. टीम इंडियाच्या गोटातून एक इंटरेस्टिंग बातमी समोर आलीय. टीम इंडियाचे सर्व खेळाडू सध्या लंडनमध्ये अरुन्डेल येथे प्रॅक्टिस करतायत. सर्वच खेळाडू बसमधून पोहोचले. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराला स्पेशल कार मिळालीय.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली टीम बसमधून प्रॅक्टिससाठी पोहोचतायत. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराला कार मिळाली आहे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, असं का?. पुजाराला इतकी स्पेशल ट्रीटमेंट का? त्यामागच कारण जाणून घ्या.

म्हणून चेतेश्वर पुजाराला स्पेशल कार

चेतेश्वर पुजाला स्पेशल कार मिळालीय, त्यामागच कारण आहे, कॅप्टनशिप. चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये ससेक्स टीमचा कॅप्टन आहे. त्याचा ससेक्स काऊंटीसोबत करार आहे. त्याला तिथे घरापासून इतरत्र प्रवास करण्यासाठी स्पेशल कार मिळाली आहे. चेतेश्वर पुजारा त्याच कारने प्रवास करतो. दुसऱ्याबाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंना दुसऱ्या परदेश दौऱ्याप्रमाणे बस उपलब्ध करुन दिली आहे. सर्व खेळाडू हॉटेलमध्ये थांबले आहेत.

कितीवेळ प्रॅक्टिस केली?

चेतेश्वर पुजाराला गाडीमधून येताना पाहून ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने त्याची मस्करी केली. जाडेजा आणि पुजारा थोडावेळ परस्पराशी बोलले. टीम इंडियाच्या सरावाबद्दल बोलायच झाल्यास, सर्व प्लेयर्सनी 3 ते 4 तास कसून सराव केला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी बराचवेळ गोलंदाजी केली. पत्रकार विमल कुमार यांच्या रिपोर्टनुसार, अरुन्डेलमध्ये सराव संपल्यानंतर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यात बराचवेळ चर्चा झाली.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चेतेश्वर पुजारा टीमसाठी तुरुपचा एक्का ठरु शकतो. तो ससेक्ससाठी एप्रिलपासून खेळतोय. दोन महिन्यात 8 इनिंगमध्ये पुजाराने 3 सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकवली आहे.