AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs LSG : बंगळुरु विरुद्ध लखनऊ सामन्यातील वाद आणि विराट कोहलीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, अनिल कुंबळे म्हणाला…

लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना झाला. हा सामना बंगळुरुने 18 धावांनी जिंकला. मात्र त्यानंतर झालेला वाद आणि आता विराट कोहलीची पोस्ट चर्चेत आहे.

RCB vs LSG : बंगळुरु विरुद्ध लखनऊ सामन्यातील वाद आणि विराट कोहलीची 'ती' पोस्ट चर्चेत, अनिल कुंबळे म्हणाला...
दरम्यान, कुलदीपने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती.
| Updated on: May 02, 2023 | 12:38 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला. हा सामना झाल्यानंतर जो काही वाद झाला त्यामुळे जास्तच चर्चेत आला. कारण आजी माजी खेळाडू असलेले गौतम गंभीर आणि विराट कोहली भिडले. दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. यामुळे दोघांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. दोघांच्या सामना मानधनातून 100 टक्के फी दंड म्हणून आकारली आहे. या पूर्ण घटनाक्रमानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टचा संबंध थेट वादाशी जोडला जात आहे.

विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, ते तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही.”

सामन्यातील वादानंतर माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. तसेच झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खेळाडूंनी एकमेकांचा आदर करायला हवं असं स्पष्टपणे सांगितलं.

“खेळताना बऱ्याच भावना आपल्या मनात असतात. पण त्या अशा पद्धतीने व्यक्त करू नये. बोलण्यापर्यंत ठिक आहे. पण सामन्यात जे काही झालं ते चुकीचं आहे. तुम्हाला एकमेकांचा आदर करायला लागेल. खेळ भावना जपली पाहीजे.”, असं अनिल कुंबळे याने सांगितलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनऊ सुपर जायंट्सने विरुद्धचा सामना 18 धावांनी जिंकला. या विजयासह बंगळुरुला गुणतालिकेत चांगला फायदा झाला आहे.पाचव्या स्थानावर बंगळुरुने 10 गुणांसह झेप घेतली आहे. आता गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सचे प्रत्येकी 10 गुण आहेत.

दोन्ही संघाचे खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.

Follow Us
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी