
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. वेस्ट इंडिज 140 धावांवर 4 गमावले आहेत. दरम्यान, भारताने पहिला डाव 5 गडी बाद 518 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताकडे अजूनही 378 धावांची आघाडी आहे. ही आघाडी मोडून काढणं वेस्ट इंडिजला कठीण जाणार आहे. दुसरीकडे, तिसऱ्या दिवशी झटपट विकेट काढाव्या लागणार आहेत. असं असताना दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात यशस्वी जयस्वाल धावचीत होत तंबूत परतला. खरं तर कसोटी सामन्यात धावचीत होणं हा क्रीडाप्रेमींच्या मते गुन्हा आहे. कारण तुमच्यावर चोरटी धाव घेण्याचं तसं काही दडपण नसतं. पण ही चूक यशस्वी जयस्वालला महागात पडली. 175 धावांवर असताना धावचीत झाला आणि तंबूत परतला. त्यामुळे द्विशतकाची संधी हुकली. पण रनआऊटची चर्चा रंगली आहे.
यशस्वीने मिड ऑफच्या दिशेने चेंडू मारला आणि धाव घेतली. पण शुबमन गिलने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला अर्ध्यातून परतावं लागलं. यात जयस्वाल धावचीत झाला. आता रनआऊट करताना विकेटकीपरच्या हाती चेंडू होता का यावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयासाठी अनिल कुंबलेने पंचांना धारेवर धरलं आहे. दाद मागण्यासाठी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे का सोपावला नाही. अनिल कुंबळे म्हणाले की, ‘चेंडू कीपरच्या पूर्णपणे नियंत्रणात नव्हता. त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे जायला हवा होता. त्यामुळे आश्चर्य वाटलं. बेल्स उडवल्या तेव्हा चेंडू हातात होता की नाही याबाबत शंका होती.’
Shubman Gill had a chance to be a good captain today but he failed to do so, resulting in Yashasvi Jaiswal being run out.💔😭 pic.twitter.com/9b5csGWbqD
— CricSachin (@Sachin_Gandhi7) October 11, 2025
दुसरीकडे, यशस्वी धावचीत होण्यासाठी गिल जबाबदार होता का? असा प्रश्नही अनेक जण विचारत आहेत. अनिल कुंबळे यांनी सांगितलं की, ‘ही यशस्वी जयस्वालची चूक होती. कारण चेंडू थेट मि़ड ऑफच्या खेळाडूकडे गेला होता. त्यामुळे काहीच संधी नव्हती. त्याची खेळण्याची पद्धत आज थोडी वेगळी होती. मला वाटलं की पहिल्या दिवशीच्या माइंडसेटने येईल. पण तो काल संध्याकाळच्या माइंडसेटने उतरला होता. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं होतं. तो मोठ्या खेळीसाठी सेट झाला होता.’