What a Catch! जोरदार फटका आणि दुखापतही, पण साई सुदर्शनने असा पकडला झेल Video
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने 518 धावांवर डाव घोषित केला. यानंतर फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजला 21 धावांवर पहिला धक्का बसला. पण ही विकेट अशी तशी मिळाली नाही. तुम्हीच पाहा व्हिडीओ आणि ठरवा.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी कसोटी मालिका सुरु आहे. ही मालिका भारताला 2-0 ने जिंकण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यावरही भारताची मजबूत पकड आहे. भारताने पहिल्या डावात 518 धावा केल्या आणि डाव घोषित केला. आता टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजचे विकेट झटपट बाद करण्याचं आव्हान आहे. भारताने पहिल्या डावात केलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. वेस्ट इंडिजला पहिला धक्का 21 धावांवर बसला. पण ही विकेट काय सोपी नव्हती. या विकेटसाठी साई सुदर्शनचं योगदान खूपच महत्त्वाचं होतं. दुखापत झाल्यानंतरही त्याने अप्रतिम झेल घेतला आणि वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला तंबूत जाण्यास भाग पाडलं. साई सुदर्शनने पकडलेल्या झेलची आता चर्चा होत आहे.
वेस्ट इंडिजच्या डावातील आठवं षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा आला होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कँपबेलने जोरदार स्विप शॉट मारला. पण साई सुदर्शन जवळ भिंतीसारखा उभा होता. शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या साई सुदर्शनच्या हाताला चेंडू लागला. पण त्याने झेल सोडला नाही. त्यामुळे कँपबेलला काही क्षण खरंच आऊट झालो का असा प्रश्न पडला. पण साई सुदर्शनने अप्रतिम झेल पकडला. कँपबेल 25 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. पण साई सुदर्शन दुखापत झाल्याने मैदानाबाहेर केला. पण त्याने पकडलेला झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
What a grab by Sai Sudharsan! Unbelievable 🤯
Sunil Gavaskar in the commentary background: ‘He caught it, he caught iitttt!pic.twitter.com/7cVpUn48mo
— GillTheWill (@GillTheWill77) October 11, 2025
दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात खरं तर साई सुदर्शनचं क्रिकेट करिअर पणाला लागलं आहे. इंग्लंड कसोटी फेल गेल्यानंतर त्याच्यावर दबाव वाढला होता. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. त्याने 165 चेंडूत 12 चौकार मारत 87 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त 13 धावांनी हुकलं. कसोटी क्रिकेटमधील साई सुदर्शनची ही दुसरी अर्धशतकी खेळी आहे. साई सुदर्शनने पाच कसोटी सामन्यातील आठ डावात 29.25 च्या सरासरीने 234 धावा केल्या आहेत.
