लाईव्ह सामन्यात मधमाश्यांचा हल्ला, मैदानात खेळाडूंची पळापळ Watch Video

इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत वॉर्सेस्टरशर आणि एसेक्स यांच्यात सामना सुरु असताना मधमाश्यांनी हल्ला चढवला. लाईव्ह सामन्यात असा प्रकार घडल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला. नेमकं कसं काय झालं ते वाचा

लाईव्ह सामन्यात मधमाश्यांचा हल्ला, मैदानात खेळाडूंची पळापळ Watch Video
लाईव्ह सामन्यात मधमाश्यांनी खेळाडूंवर हल्ला चढवला, खेळ तसाच सोडून धावाधाव
Image Credit source: स्क्रीनशॉट/इन्स्टाग्राम
| Updated on: May 17, 2025 | 3:45 PM

काउंटी चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन वनच्या एका सामन्यात विचित्र घटना घडली. वॉर्सेस्टरशर आणि एसेक्स हे दोन संघ आमनेसामने आले होते. एसेक्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्सेस्टरशर प्रथम फलंदाजी करताना सुरुवात काही चांगली झाली नाही. एसेक्सच्या गोलंदाजांनी वॉर्सेस्टरशरला सुरुवातीला धक्के दिले. 123 धावांवर पाच गडी गमावले होते. पण मैदानात या दरम्यान एक प्रकार असा घडला की सर्व खेळाडू आणि पंचांना थेट मैदानावर लोटांगण घालावं लागलं. कारण मधमाश्यांनी मैदानावर हल्ला केला होता. यामुळे सामना थांबवून मैदानावर लोटांगण घालण्याशिवाय पर्याय नव्हता. मधमाश्या मैदानाबाहेर जाईपर्यंत सामना थांबवण्यात आला. हा व्हिडीओ काउंटी चॅम्पियनशिपने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड केला आहे.

मधमाश्यांनी अचानक हल्ला चढवल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खेळाडू, पंच आणि स्टाफ जमिनीवर झोपला होता. टॉम टेलर फलंदाजी करत होता. त्याने गॅपमध्ये चेंडू मारला आणि धावा घेण्यासाठी धाव घेतली. पण चौकार गेला आणि अचानक विकेटकीपर मैदानात झोपला. पंचही चौकार देण्यात धुंद होते. त्यांनाही मधमाश्यांचा हल्ल्याचा अंदाज आणि ते देखील मैदानावर आडवे पडले. टेलरदेखील विकेटकीपरच्या बाजूलाच आडवा झोपला.

वॉर्सेस्टरशरने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 97.3 षटकांचा सामना केला. तसेच 9 गडी गमवून 356 धावा केल्या. रॉब जॉन्स आणि मॅथ्यू वेटने यांनी अर्धशतकी खेळी केल्याने हा डाव सावरला. रॉब जॉन्सने 117 चेंडूत 54, तर मॅथ्यू वेटने 91 चेंडूत 73 धावांची खेळी केली. मॅथ्यू वेट आणि टॉम टेलर यांनी आठव्या विकेटसाठी 95 धावांची उपयुक्त भागीदारी करून संघाला 350 च्या जवळ नेले. खेळ संपला तेव्हा बेन एलिसन 34 आणि यादविंदर सिंग 5 धावांवर खेळत आहेत.

एसेक्सकडून शेन स्नेटरने तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर नोहा थेन आणि मॅट क्रिचली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जेमी पोर्टर आणि कसुन रंजिता यांना प्रत्येकी एक यश मिळाले.