AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर मी कोच असतो तर.. रवि शास्त्री यांचा अप्रत्यक्षरित्या गौतम गंभीरला टोला, रोहित शर्माबाबत केलं असं भाष्य

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचं रुपडं पालटणार आहे. दोन अनुभवी खेळाडूंची उणीव इंग्लंड दौऱ्यात भासणार आहे. असं असताना रोहित शर्माच्या निवृत्तीवरून माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या माध्यमातून त्यांनी गौतम गंभीरवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

जर मी कोच असतो तर.. रवि शास्त्री यांचा अप्रत्यक्षरित्या गौतम गंभीरला टोला, रोहित शर्माबाबत केलं असं भाष्य
रवि शास्त्री आणि रोहित-गंभीरImage Credit source: PTI
| Updated on: May 16, 2025 | 7:25 PM
Share

भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यात कसोटी लागणार यात काही शंका नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्याने खळबळ उडाली आहे. कारण बीसीसीआयपुढे नव्याने संघ बांधणीचं आव्हान आहे. कर्णधारापासून संपूर्ण संघ बांधण्यासाठी बीसीसीआयसाठी निवड समिती खलबतं करत आहे. दोन दिग्गज खेळाडूंची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेवर परिणाम होणार आहे. सुरुवातीपासून विजयी टक्केवारी मजबूत ठेवायची असेल तर या मालिकेत कमाल करावी लागणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी रोहित शर्माबाबत भाष्य केलं आहे. या विधानातून त्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.

रोहित शर्माने 7 मे रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली होती. म्हणजेच रोहित शर्माचा शेवटचा कसोटी सामना मेलबर्नमद्ये झाला होता. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. सिडनीमध्ये खेळलेल्या कसोटीत रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. ब्रॉडकास्टरशी बोलताना रोहितने स्पष्ट केलं होतं की, तो स्वत:हून या सामन्यातून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

रवि शास्त्री यांनी आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये खुलासा केला की, काही दिवसांपूर्वी मुंबईत रोहित शर्मासोबत चर्चा झाली होती. तेव्हा सिडनी कसोटीबाबत त्याच्याशी बोललो. असं सांगत रवि शास्त्री पुढे म्हणाले की, ‘कदाचित मी रोहित शर्माला सांगितलं होतं की, जर मी कोच असतो तर तो सामना खेळणार नाही असं झालं नसतं.तो शेवटचा कसोटी सामनाही खेळू शकला असता. कारण मालिका धोक्यात होती.’ रवि शास्त्री यांनी अप्रत्यक्षरित्या गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.

‘लगेच हार पत्कारण्यापैकी मी नाही. जेव्हा मालिका 2-1 अशी होती तेव्हा संघाला सोडून जावं. तो सामना असा होता की त्यात 30-40 धावा खूप होत्या.’ असं रवि शास्त्री पुढे म्हणाले. सामन्यानंतर रोहितने स्पष्ट केलं होतं की या फॉर्मेटमध्ये खेळत राहणार आहे. फक्त एका सामन्यासाठी बाहेर बसलो होतो. पण पाच महिन्यातच त्याने निवृत्ती जाहीर केली.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...