6 चेंडूत 6 धावांची गरज..! गोलंदाजाने सामना पूर्णपणे पारड्यात झुकवला, पण एक चूक आणि पराभव झाला
CPL 2026: कॅरेबियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अँटीगुआ अँड बरबुडा फालकन्स आणि जमैकन किंग्समेन यांच्यात पार पडला. हा सामना अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्सने 2 गडी राखून जिंकला. पण शेवटच्या षटकात थरार पाहायला मिळाला.

कॅरेबियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून पहिल्याच सामना रोमांचक झाला. या सामन्यात अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्स आणि जमैकन किंग्समेन आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकाची कौल अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर जमैकन किंग्समेनने 20 षटकात 7 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्सने शेवटच्या चेंडवर पूर्ण केलं. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती आणि या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि विजयाची चव चाखली. खरं तर हा सामना अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्सने पारड्यात झुकलेला होता. पण शेवटच्या षटकात हुनैन शाह याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि दोन विकेट काढल्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आणला. पण शेवटच्या चेंडूवर केलेली एक चूक भोवली आणि हातातला सामना गेला.
शेवटच्या षटकात काय झालं?
जमैका किंग्समेनचा कर्णधार रोमन पॉवेल याने चेंडू हुनैन शाहच्या हाती सोपवला.शामर स्प्रिंगर आणि जहमार हॅमिल्टन दोघं मैदानात होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूचा सामना शामरने केला आणि दोन धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा सामना करताना शामरने फटका मारला आणि एक धाव घेतली. जहमार हॅमिल्टन स्ट्राईकला आला आणि पण हुनैन शाहने त्याला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे पुन्हा तीन चेंडूत तीन धावा अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूचा सामना करण्यासाठी आलेला उसामा मीर झेल बाद झाला आणि सामना जमैका किंग्समेनच्या पारड्यात झुकला. दोन चेंडूत 3 धावा अशी स्थिती आली आणि स्ट्राईकला अल्झारी जोसेफ होता. त्याने एक धाव घेतली आणि शामर स्प्रिंगरला स्ट्राईक दिली. शामरने शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना दोन धावा घेतल्या आणि अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्सला सामना जिंकवून दिला.
शेवटच्या चेंडूवर रनआऊटची संधी सोडली
हुनैन शाहच्या गोलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवर सोपा रनआऊट सोडला. शेवटचा चेंडू हुनैनने यॉर्कर टाकला होता. त्यामुळे हा फटका वरून मारणं काही जमलं नाही. पण रोमन पॉवेलच्या दिशेने चेंडू गेला. त्याच्या हातात जाण्यापूर्वी वेगाने एक धाव घेतली. तर रोमन पॉवेल रनआऊट करण्यासाठी चेंडूवर वेगाने धावत आला पण त्याच्याकडून चूक झाली आणि चेंडू हातून सुटला. शामरने वेगाने दोन धावा घेतल्या आणि अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्सने सामना जिंकला.