IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जा

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. नऊ वर्षानंतर भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी खेळणार आहे. त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे.

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जा
IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जा
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 07, 2026 | 10:21 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील बहुचर्चिक कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. या मालिकेत दोन सामने होणार असून भारतीय संघ 9 वर्षांनी श्रीलंकेत दाखल झाला आहे. 9 वर्षापूर्वी भारताने श्रीलंकेत कसोटी मालिका खेळली होती. त्यामुळे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकन भूमीत कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ आल्याने उत्साहाचं वातावरण आहे. क्रीडाप्रेमींचा उत्साह पाहता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने चाहत्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दोन्ही कसोटी सामन्यांसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री फ्री केली आहे. यासाठी एकही रुपया मोजण्याची गरज नाही. त्यामुळे भारत श्रीलंका कसोटी मालिकेसाठी मैदानात प्रेक्षकांची गर्दी होईल असा अंदाज आहे.

भारत श्रीलंका यांच्यात श्रीलंकन भूमीत नऊ वर्षांनी कसोटी मालिका होत आहे. पण गेल्या साडे चार वर्षात दोन्ही संघात एकही कसोटी मालिका किंवा सामना झालेला नाही. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. श्रीलंकन भूमीत 2017 नंतर दोन्ही संघ कसोटी मालिका खेळणार आहेत. भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल क्रिकेट मैदानात खेळला जाणार आहे. हा सामना 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान असेल. तर दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान कोलंबोतील आरएस प्रेमदासा मैदानात खेळला जाईल. जास्तीत जास्त प्रेक्षकांना मैदानात खेचण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने युक्ती लढवली आहे.

भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यासाठी फ्री एन्ट्री ठेवली आहे. कसोटी सामने पाहण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे. त्यात श्रीलंकेत भारत पुन्हा कधी कसोटी मालिका खेळणार हे काही सांगता येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना या मालिकेचा मैदानात उपस्थित राहून आनंद लुटता यावा यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर या मालिकेचा काय परिणाम होणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ शर्यतीत आहे. भारत 48.15 विजयी टक्केवारीसह पाचव्या, श्रीलंका गुणतालिकेत 41.67 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. भारताने दोन्ही सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 57.58 टक्के होईल. तर दोन्ही सामने गमावले तर भारताची टक्केवारी 39.39 वर येईल आणि सहाव्या स्थानावर घसरण होईल. तर श्रीलंका दोन्ही विजयासह 61.11 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानी पोहोचेल. दोन्ही सामने ड्रॉ झाले तर भारत 45.45 विजयी टक्केवारीसह पाचव्या, तर श्रीलंका 38.39 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानी राहील.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us