क्रिकेट विश्वात खळबळ! नाईट क्लबबाहेर स्टार क्रिकेटरला अटक, मध्यरात्री काय घडलं?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्टार क्रिकेटपटूला नाइट क्लब बाहेरुन अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली आहे. कारण एका स्टार क्रिकेटपटूला नाइट क्लब बाहेरुन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बेड्या घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आता हा स्टार क्रिकेटर कोण आहे? नेमकं काय घडलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या सविस्तर…
क्रिकेटपटूचं नाव काय?
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. व्हिडीओमध्ये कार्सला डर्बी येथील एका नाईट क्लबच्या बाहेर पोलिस अधिकाऱ्यांसोबत नेताना पाहण्यात आले. इंग्लंड क्रिकेट संघाच्या अडचणी मैदानाबाहेरही संपण्याचे नाव घेत नाहीत.
कार्स पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडच्या कसोटी संघाचा भाग आहेत, पण पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा न मिळाल्यानंतर त्यांना डरहमकडून काउंटी चॅम्पियनशिप सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. डरहमने डर्बीशायरला तीन दिवसांत पराभूत केले. कार्सने सामन्यात २६ धावा केल्या आणि गेंदबाजीत एकूण दोन विकेट घेतले. सामना संपल्यानंतर ते संघातील सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करायला गेले होते, तेव्हा ही घटना घडली.
व्हिडीओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका छोट्या व्हिडीओमध्ये कार्सचे हात मागे बांधलेले आणि बेड्या घातलेल्या दिसत आहेत. ते आपल्या डरहम संघातील सहकारी मॅथ्यू पॉट्सशी बोलताना दिसत आहेत. इंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार बेन स्ट्रोक्सही व्हिडीओच्या मागे दिसत आहेत. मात्र, घटनेचे कारण आणि पोलिसांनी कार्सला कोणत्या परिस्थितीत ताब्यात घेतले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ECB ने रविवारी निवेदन जारी करून सांगितले की, “आम्हाला डर्बीमध्ये गेल्या रात्री घडलेल्या एका घटनेची माहिती आहे आणि आम्ही सध्या त्याची चौकशी करत आहोत. शक्य झाल्यावर आम्ही पुढील माहिती देऊ.” डर्बीशायर पोलिसांकडेही या प्रकरणावर प्रतिक्रिया मागण्यात आली आहे, तर डरहमने भाष्य करण्यास नकार दिला आहे.