AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi language Row : नाही बोलणार मराठी, कांदिवलीत सरळ-सरळ अमराठी रिक्षा चालकांची दादागिरी, ट्रॅफिक जाम करुन मुजोरी

Marathi language Row : राज्य सरकारने टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती केली आहे. मराठी बोलता आलचं पाहिजे. त्या विरोधात आता अमराठी चालक सरळ-सरळ दादागिरी करतायत. मुजोरी दाखवत आहेत.

Marathi language Row : नाही बोलणार मराठी, कांदिवलीत सरळ-सरळ अमराठी रिक्षा चालकांची दादागिरी, ट्रॅफिक जाम करुन मुजोरी
Kandivali Link Road
| Updated on: Aug 24, 2026 | 10:22 AM
Share

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी : मराठी बोलता न येणाऱ्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचालकांविरोधात राज्य सरकारच्या RTO विभागाने कारवाई सुरु केली आहे. त्याला विरोध म्हणून आज कांदिवली लिंक रोडवर लालजीपाडा येथे काही अमराठी रिक्षा चालकांनी दादागिरी केली. या रिक्षा चालकांनी आपली मुजोरी दाखवून दिली. आम्ही मराठी भाषा नाहीच बोलणार हाच संदेश त्यांनी आपल्या कृतीमधून दिला. कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीविरोधात हे रिक्षा चालक दादागिरी दाखवत आहेत. मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा रोखून आंदोलन सुरु आहे . लिंक रोडवर 20 मिनिटांपासून वाहतूक जाम झाली आहे.जे रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करत होते, त्यांना धमकावलं जात होतं.

लिंक रोडवरून प्रवासी घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या ऑटो रिक्षा चालकांना धमकावण्याचा प्रकार घडला. अमराठी रिक्षा चालकांनी रस्ता रोको केला. याला आंदोलन म्हणता येणार नाही. कारण राज्य सरकारने मराठी बोलता न येणाऱ्या मराठी रिक्षा चालकांना मागच्या काही महिन्यांपासून बरीच मुदतवाढ दिली होती. त्यांना मराठी शिकण्यासाठी क्लासेसचीही व्यवस्था केली होती. मात्र तरीही काही टॅक्सी, रिक्षा चालक मराठी सक्ती विरोधात आंदोलन करत आहेत.

रिक्षा चालकांकडून हंगामा

कांदिवलीत मराठी सक्तीवरून रिक्षा चालकांच्या या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला आहे. मराठी सक्ती विरोधात अमराठी रिक्षा चालक हंगामा करत आहेत. कांदिवली लिंक रोडवर गेल्या 30 मिनिटांपासून अमराठी रिक्षा चालकांकडून हंगामा सुरू आहे.प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकांना अडवून त्यांना धमकावले जात आहे.

RTO कडून कारवाई

संपूर्ण लिंक रोड जाम करून ठेवण्यात आला आहे. मराठी भाषा येत नसलेल्या ऑटो रिक्षा चालकांवर RTO कडून कारवाई केली जात आहे, या कारवाईच्या विरोधात हे अमराठी रिक्षा चालक रस्त्यावर उतरून दादागिरी करत आहेत.सध्या कांदिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून लिंक रोड मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या रिक्षा चालकांनी आज रिक्षा संप पुकारल्यामुळे लिंक रोडवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका