AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी थांबणार नाही, कुणाच्याही… संजय निरुपम यांचेही थेट आव्हान; कुणाकडे रोख

1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात आलीये. मात्र, त्या निर्णयाच्या विरोधात अनेकजण मैदानात उतरले आहेत. काल या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला. यावर आता संजय निरुपम यांनी मोठे भाष्य केले.

मी थांबणार नाही, कुणाच्याही... संजय निरुपम यांचेही थेट आव्हान; कुणाकडे रोख
Sanjay Nirupam
| Updated on: Apr 25, 2026 | 10:43 AM
Share

1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालक संतापले आहेत. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध केला. काही नेते या निर्णयाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका घेतली. यावरून वाद नको, असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. यादरम्यानच संजय निरुपम यांनी काल झालेल्या राड्यावर मोठे विधान केले. रिक्षाचालकांना मराठी सक्तीचा विरोध करताना संजय निरुपम दिसले. संजय निरुपम यांनी म्हटले की, रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना 1 मेपासून मराठी सक्ती केली जाणार आहे. त्यांची एक टेस्ट होईल मराठी भाषेवर. जर ती टेस्ट ते नापास झाले तर त्यांचे परमिट रद्द होईल.

माझा विरोध फक्त इतकाच आहे की, कोणाचेही रोजी रोटी धंदा तुम्ही हिस्साहून घेऊ नका. कारण असे आहे की, ते सर्व गरीब आहेत, कमजोर आहेत. दिवसरात्र ते रिक्षा चालून टॅक्सी चालून उदरनिर्वाह करतात. हा विषय मी मंत्री महोदयांपुढे ठेवला, त्यांनी सांगितले की, आम्ही पुढच्या आठवड्यात बसणार. त्यापूर्वी मी विचार केला की, त्यांना जाऊन सांगितले पाहिजे की, आम्ही तुमच्यासोबत आहोत.

पूर्ण शासन तुमच्यासोबत आहे. मात्र, ज्याप्रकारे माझ्याविरोधात नारे लावले, शिवीगाळ केला… मी पण शिवीगाळ करू शकतो.. पण मला शिवसेना आणि मनसेमध्ये वाद पेटवायचा नाही. शेवटी आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची बांधिलकी ठेवणारे लोक आहोत. त्यांचा पक्ष आहे किंवा आमचा पक्ष आहे, उबाठा आहे. बाळासाहेबांचा काय विचार होता, मराठी लोकांसाठी.

मराठी लोकांसाठी लढले पाहिजे, आम्ही पण लढतो. मराठी लोकांसाठी लढतो. मराठी भाषेसाठी काम करतो. त्यामुळे मला त्यांच्याविरोधात काहीही बोलायचे नाही. पण मला या विषयाला पुढे घेऊन जायचे नाही. जे गोरगरीब लोक आहेत, त्यांच्याबरोबर राहणारा माणूस आहे. मी करणार… त्यांना वाटले असेल की, ते माझ्याविरोधात आले.. नारे वगैरे लावले. पण मी थांबणार नाही.. मी थांबणारा माणूस नाही.. मी लढणारा माणूस आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप