AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठीला आमचा विरोध नाही, पण… संजय निरुपम यांचे खळबळजनक विधान, मनसेची गाडीवर दगडफेक

Sanjay Nirupam : शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये मराठी भाषेच्या कडक सक्तीबाबत ऑटोचालकांशी संवाद साधला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचे समोर आले आहे.

मराठीला आमचा विरोध नाही, पण... संजय निरुपम यांचे खळबळजनक विधान, मनसेची गाडीवर दगडफेक
Sanjay NirupamImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 24, 2026 | 4:02 PM
Share

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालक संतापले आहेत. आज शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये मराठी भाषेच्या कडक सक्तीबाबत ऑटोचालकांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे नेते नयन कदम आणि कुणाल मईणकर कार्यकर्त्यांसोबत येथे पोहोचले होते. यावेळी मनसेकडून घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच संजय निरुपम यांनी मराठीला विरोध केला तर त्यांना धडा शिकवला जाईल असं विधान केले. यानंतर संजय निरुपम यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

आमचा मराठीला विरोध नाही…

मुंबईतील दहिसरमध्ये बोलताना संजय निरुपम यांनी म्हटले की, आमच्या पक्षाची आणि एकनाथ शिंदे यांची सुरूवातीपासून ही भूमिका आहे की, महाराष्ट्रात जे लोक राहतात, त्यांनी मराठीत बोललं पाहिजे, याबाबत कुणाला शंका नाही. महाराष्ट्रात मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे याबाबतही कुणाचा आक्षेप नाही. मात्र मराठी भाषेच्या नावाखाली जोर जबरदस्ती करणे, गुंडगिरी करणे, सक्ती करणे, एखाद्याला धमकावणे हे चुकीचं आहे आणि आमचा याला विरोध आहे.

मराठी शिकण्यासाठी वेळ द्यावा…

महाराष्ट्र सरकारच्या नवीन जीआरचा जो मुद्दा आहे, तो जीआर आजचा नाहीये, तो 2019 चा आहे. त्यावेळी असा जीआर आला होता की ऑटोवाले आणि टॅक्सी चालवणारे जे लोक आहेत त्यांनी मराठीत बोलायला हवं. अशा मागणी असणे चुकीचे नाहीये, मात्र यासाठी आपल्याला ऑटो आणि टॅक्सी चालकांना थोडा वेळ द्यावा लागेल. त्यांना मराठी शिकण्याची संधी द्यावी लागेल. खुप असे चालक आहेत जे मराठी भाषेत बोलतात, मात्र काहींना मराठी बोलता येत नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो जीआर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची सर्वांना मराठी यायला हवी ही एक बाजू चांगली आहे.

गाडीवर दगडफेक

पुढे रिक्षा चालकांना आवाहन करताना निरुपम यांनी म्हटले की, तुम्हाला मोडक्या तोडक्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधायला यायला हवा. मात्र जीआर मध्ये म्हटले आहे, एक मे नंतर रिक्षा चालकांची टेस्ट होईल. यात ते नापास झाले तर त्यांचे परमिट रद्द करण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा धंदा बंद पडू शकतो. त्यामुळे मी सरनाईक यांनी पत्र लिहून याबाबत कळविले आहे की हे चुकीच आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा. दरम्यान, यानंतर संजय निरूपम यांचा कारवर मनसेकडून दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Follow Us
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...