AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणी सरकार अॅक्शन मोडमध्ये; दोषींवर होणार कारवाई, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणी सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्र्यांनी दिली.

३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणी सरकार अॅक्शन मोडमध्ये; दोषींवर होणार कारवाई, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
amravati tragedyImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 10:18 AM
Share

अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये व्हेंटिलरच्या स्फोटाच्या आगीत 3 नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन नवजातांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या घटनेवर आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

दुर्दैवाने तिघांना वाचवता आलं नाही – आबिटकर  

अमरावतीमधील घटनेची माहिती घेतल्यानंतर मंत्री आबिटकर म्हणाले, ‘ अमरावतीमध्ये स्फोट झाला की शॉर्ट सर्किट झाला, हे स्पष्ट व्हायचं आहे. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून नवजातांना वाचवलं. दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला. या बालकांना वाचवता आले नाही. दुर्घटनेनंतर काहींना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही खासगीमध्ये आहेत. तर काही सरकारीमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते आता सुरक्षित आहेत. दुर्दैवाने तिघांना वाचवता आलं नाही, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री आबिटकर अमरावतीत पोहोचणार 

‘घटना साडेतीन वाजता घडली. मी दुपारपर्यंत घटनास्थळी पोहोचणार आहे. आमचे सर्व अधिकारी पोहोचणार आहे. पालकांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन जाणार आहोत, असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, आरोग्यमंत्री दुपारपर्यंत अमरावतीमध्ये पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत आरोग्य सचिव डॉ. निपुण देखील असणार आहेत. घटनास्थळी पोहोचून या संपूर्ण घटनेची माहिती घेतील.

घटनेनंतर नवनीत राणा आक्रमक

अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये व्हेंटिलरच्या स्फोटाच्या आगीत 3 नवजातांच्या मृत्यूनंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयाची पाहणी केली. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणेवर ही नवनीत राणां यांनी सवाल केला. फायर ऑडीट झालं होतं की नाही, याची माहिती नवनीत राणा यांनी मागितली. पाहणी केल्यानंतर नवनीत राणा यांनी फोनवरून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संवाद साधला.

Follow Us
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका