दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला जामीन नाकारला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या अभिषेक पोरेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. तसेच त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला जामीन नाकारला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरलला जामीन नाकारला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 14, 2026 | 7:09 PM

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज अभिषेक पोरेलवर एका तरूणीने लग्नाचा आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी हुगली जिल्ह्यातील मोगरा पोलिसांनी त्याला अटक केली होती. 11 ऑगस्टला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर कोर्टात दाखल केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तीन दिवस संपल्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे. तरूणीने 23 जूनला मोगरा पोलीस ठाण्यात पोरेल विरुद्ध तक्रार नोंदवली होती. तक्रारीत तिने जवळपास साडे तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं आहे. तसेच लग्न करण्याचं वचन देऊन फसवणूक केल्याचं आरोप केला आहे. इतकंच या दरम्यान या दोघांनी एकत्र परदेशवारीही केली होती, असंही तिने सांगितलं आहे. पण त्यानंतर पोरेलने तिच्यासोबत नातं जुळवण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार केली.

तक्रारीनुसार, अभिषेक पोरेल आणि सदर तरूणीमध्ये दीड वर्षांपासून वाद सुरू होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात पोहोचलं होतं. पण पोलिसांनी तेव्हा तक्रार दाखल करून घेतली नव्हती. पण पोलीस तपास सुरू होता आणि चंदननगरमध्ये पोरेलच्या निवासस्थानी अनेकदा गेले होते. पण तिथे काही त्याचा थांगपत्ता लागला नाही. अखेर तरूणीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि दाद मागितली.  20 जुलैला न्यायालयाने त्याला अटक करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर पोलिसांनी पोरेलला बेड्या ठोकल्या. तसेच त्याच्याकडील कथित पेन ड्राईव्ह जप्त करण्यास सांगितला होता.

अभिषेक पोरेलची क्रिकेट कारकिर्द

अभिषेक पोरेल 23 वर्षांचा असून विकेटकीपर फलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळते. त्याने 32 फर्स्ट क्लास सामन्यातील 50 डावात 1408 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तर लिस्ट ए सामन्यात 833 धावा केल्या आहेत. तर 61 टी20 सामन्यात त्याने 1590 धावा केल्या आहे. टी20 मध्ये त्याच्या नावावर 11 अर्धशतकं आहे. यापैकी 4 अर्धशतकं ही दिल्ली कॅपिटल्स संघासाठी ठोकली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us