AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोनीचा जबरा फॅन, भेटण्यासाठी पार केलं तब्बल 1400 किमीचं पायी अंतर, धोनी भेटणार का?

क्रिकेटपटू हे भारतीयासांठी फक्त खेळाडू नसून त्यांचे 'हिरो' असतात. अनेकजण केवळ आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी आकाश-जमीन एक करतात. एका धोनी फॅननेही असंच काही केलं आहे, ज्याची चर्चा सर्वत्र आहे.

धोनीचा जबरा फॅन, भेटण्यासाठी पार केलं तब्बल 1400 किमीचं पायी अंतर, धोनी भेटणार का?
एमएस धोनीचा जबरा फॅन अजय
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 7:20 PM
Share

रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याचे लाखो चाहते आहेत. अनेकदा मैदानात सामना सुरु असताना पळत येऊन धोनीला मीठी मारणारे, तर कधी पाया पडणारे अनेक जण दिसले आहेत. पण धोनीचा एक चाहता तर धोनी भेटण्यासाठी थेट हरयाणावरुन रांची पायी चालत पोहोचला आहे. तब्बल 1400 किमीहून अधिकचं अंतर पार करणाऱ्या या धोनीच्या जबरा फॅनचं नाव अजय गिल असून तो हरयाणाच्या जलान खेडा येथील रहिवाशी आहे.

हातात तिरंगा आणि खांद्यावर क्रिकेट किट घेऊन अजयने 16 दिवसांत तब्बल 1 हजार 436 किलोमीटर अंतर पायी चालत पूर्ण केलं. अजय हा धोनीला भेटूनच माघारी जाणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. विशेष म्हणजे अजय क्रिकेट देखील खेळतो. पण मागील वर्षी धोनी आंतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अजयनेही क्रिकेट खेळणं सोडून दिलं आहे. धोनीला भेटून त्याचा आशीर्वाद घेऊनच पुन्हा क्रिकेट सुरु करणार असं अजयनं म्हटलं आहे.

धोनी मात्र चेन्नईत

तब्बल 16 दिवस पायी प्रवास करुन आलेल्या अजयला भेटण्यासाठी धोनी 10 मिनिटांचा वेळ काढणार का? असा प्रश्न साऱ्यानांच पडला आहे. पण अजयच्या दुर्देवाने धोनी सध्या रांचीत नसून चेन्नईला आहे. आगामी आयपीएल (IPL 2021) स्पर्धेसाठी चेन्नई सुपरकिंग संघोसोबत (CSK) धोनी युएईला रवाना होणार असल्याने. तो चेन्नईत आहे. त्यामुळे सध्यातरी तो अजयला भेटणं कठीण वाटत आहे.

हे ही वाचा

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक, दुसऱ्या कसोटीत भारताचा दबदबा

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(Cricketer MS Dhoni fan walks 1400 km to meet Dhoni at ranchi)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...