IND vs ENG : भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक, दुसऱ्या कसोटीत भारताचा दबदबा

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने दमदार भागिदारी करत भारताचा डाव सावरला. यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी गोलंदाजीच्या आक्रमणासोबत शाब्दिक आक्रमणंही केली.

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक, दुसऱ्या कसोटीत भारताचा दबदबा
जसप्रीत बुमराह

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळवला जात आहे. आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवसाचा खेळ सुरु आहे. दिवसात्या सुरुवातीलाच ऋषभ पंत आणि इशांतची विकेट गेल्यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या जोडीने अप्रतिम फलंदाजी करत एक उत्कृष्ट भागिदारी रचली आहे. दरम्यान या रंगतदार सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू चांगलेच जोशात आल्याने मैदानावर गरमा-गरमीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पंत बाद झाल्यानंतर भारताचे इतर तीन खेळाडू जे मुख्य गोलंदाज आहेत त्यांना पटपट बाद करुन फलंदाजीला सुरुवात करण्याची इंग्लंडची इच्छा होती. पण शमी आणि बुमराह जोडीने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या खेळाडूंना जेरीस आणलं. ज्यामुळे काही इंग्लंडच्या खेळाडूंनी शाब्दीक टीका करण्यास सुरुवात केली. ज्याला भारताचा आक्रमक गोलंदाज जसप्रीत बुमराहने जशास तसे उत्तर दिले. दरम्यान भारताचा कर्णधार विराटने देखील लॉर्ड्सच्या बाल्कनीतून आपला गरम अंदाज दाखवला. मैदानावरील वादात पंचाना मध्यस्थी करुन खेळाडूंना शांत कराव लागलं. या संपूर्ण वादाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शमी आणि बुमराहची विक्रमी भागीदारी

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी करत 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 77 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांनी 66 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल (Madan Lal) आणि कपिल देव (Kapil Dev) यांनी 1982 मध्ये 9 व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती. त्यांचा हा विक्रम शमी आणि बुमराहने मोडीत काढला आहे.

इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य

भारताचे शेवटच्या फळीतील फलंदाज जसप्रीस बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी अप्रतिम फलंदाजी केली. ज्यामुळे इंग्लंडला त्यांना बाद करणे जमले नाही. ज्यामुळे अखेर भारताने आपला डाव 298 धावांवर घोषित करत 272 धावांचे लक्ष्य इंग्लंडला दिलं आहे.

हे ही वाचा

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(Jasprit bumra mohammed shami Literal flirtation with england players at lords test)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI