रिंकू सिंह लग्नबंधनात अडकणार, तारीखही ठरली, होणारी बायको नेमकी कोण?

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.

रिंकू सिंह लग्नबंधनात अडकणार, तारीखही ठरली, होणारी बायको नेमकी कोण?
rinku singh and priya saroj marriage
| Updated on: Jun 01, 2025 | 3:22 PM

Rinku Singh And Priya Saroj Marriage : भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा खेळाडू रिंकू सिंह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच तो लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार रिंकू सिंह यांचे लग्न ठरले असून त्याच्या लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रिंकू सिंह आता लग्नबंधनात अडकणार असल्याने त्याची होणारी पत्नी नेमकी कोण आहे? असेही आता विचारले जात आहे.

रिंकू सिंहचे लग्न नेमके कधी होणार?

भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह येत्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे त्याची होणारी पत्नी ही एक खासदार असून त्यांचे नाव प्रिया सरोज असे आहे. प्रिया सरोज या उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या मछली शहर या मतदारसंघाच्या खासदार आहेत. या दोघांचाही साखरपुडा लखनौमध्ये होणार आहे. 8 जून रोजी लखनौमधील एका हॉटेलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे.

21 खासदारांना आमंत्रण, खेळाडूही येणार

वाराणसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा विवाहसोहळा होणार आहे. मोजक्याच लोकांमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी एकूण 21 खासदारांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. या विवाहाला माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव तसेच त्यांचे पूर्ण कुटुंब उपस्थित राहणार आहे. या विवाह सोहळ्याला भारतीय क्रिकेट संघातील अनेक मोठे खेळाडूही हजेरी लावतील. या लग्नात विराट कोहली तसेच गौतम गंभीरही येण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यात झाली होती लग्नाची चर्चा

जानेवारी महिन्यापासून या दोघांच्या लग्नाची चर्चा चालू होती. रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या लग्नासाठीची बोलणी त्यांच्या कुटुंबीयांकडून चालू होती. प्रिया सरोज यांच्या वडिलांनी आयपीएल संपल्यानंतर दोघांच्याही लग्नाची तारीख निश्चित केली जाईल, असे सांगितले होते. प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज हेदेखील तीन वेळा खासदार राहिलेले आहेत. प्रिया आणि रिंकू हे दोघेही एकमेकांना अगोदरपासूनच ओळखतात. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती.