AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 साठी नेदरलँड क्रिकेट टीम जाहीर, 2 अनुभवी खेळाडूंचं कमबॅक

Netherlands World Cup 2023 Squad | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून मोठ्या जल्लोषात सुरुवात होणार आहे. त्याआधी आता नेदरलँड क्रिकेटने 15 खेळाडूंची टीम जाहीर केली आहे.

World Cup 2023 साठी नेदरलँड क्रिकेट टीम जाहीर, 2 अनुभवी खेळाडूंचं कमबॅक
| Updated on: Sep 07, 2023 | 4:25 PM
Share

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेला मोजून महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्याआधी वर्ल्ड कपसाठी एकएक टीमची घोषणा केली जात आहे. बीसीसीआयने 5 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली.  तसेच वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे.  आता 7 सप्टेंबर रोजी नेदरलँड क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

टीममध्ये 2 दिग्गजांची एन्ट्री

स्कॉट एडवर्ड्स हा नेदरलँडचं वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार आहे. सोबतच तो विकेटकीपरची भूमिकाही बजावणार आहे. स्कॉट एडवर्ड्स यानेच गेल्या वर्षी म्हणजेच आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडचं कर्णधारपद सांभाळलं होतं. वर्ल्ड कपसाठी टीममध्ये 2 अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रूलोफ वेन डेर मेरवे आणि कॉलिन एकरमॅन यांचा समावेश आहे.

वर्ल्ड कपसाठी नेदरलँड टीम

नेदरलँडचा पहिला सामना केव्हा?

नेदरलँड वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 6 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. या सामन्यात नेदरलँडसमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करण्याआधी नेदरलँड 2 सराव सामने खेळणार आहेत. नेदरलँड ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया विरुद्ध सराव सामने खेळणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सराव सामना हा 30 सप्टेंबरला पार पडणार आहे. तर टीम इंडिया विरुद्ध सराव सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे.

नेदरलँड 12 वर्षांनंतर वर्ल्ड कपसाठी पात्र

नेदरलँडने 12 वर्षानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं आहे. नेदरलँडने याआधी भारतात 2011 साली झालेला अखेरचा वनडे वर्ल्ड कप खेळला होता. नेदरलँडने आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायरमधून श्रीलंकेनंतर क्वालिफाय केलं.

आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघांनी आयसीसी रँकिंगच्या आधारावर थेट क्वालिफाय केलं. तर उर्वरित 2 संघांची निवड ही आयसीसी वर्ल्ड कप क्वलिफायर स्पर्धेतून क्वालिफाय होणार होती. त्यासाठी एकूण 10 संघांमध्ये 18 जून ते 9 जुलैदरम्यान आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून श्रीलंकेने आधी क्वालिफाय केलं. श्रीलंका वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारी नववी आणि नेदरलँड दहावी टीम ठरली. नेदरलँडने 6 जुलै रोजी स्कॉटलँडवर मात करत वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं.

नेदरलँड उपविजेता

तसेच त्यानंतर 9 जुलै रोजी श्रीलंका विरुद्ध नेदरलँड यांच्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप क्वालिफायर अंतिम सामना पार पडला. त्या सामन्यात श्रीलंकाने 128 धावांनी बाजी मारली. तर नेदरलँड उपविजेता ठरला.

वर्ल्ड कप 2023 साठी नेदरलँड क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.