CWG 2022: भारतीय वेटलिफ्टर्सनी पदक मिळवून दिली, पण आता दुसरा मोठा धोका

| Updated on: Aug 02, 2022 | 12:46 PM

CWG 2022: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सनी कमाल केली आहे. त्यांनी भारताला सर्वाधिक पदक मिळवून दिली आहेत.

CWG 2022: भारतीय वेटलिफ्टर्सनी पदक मिळवून दिली, पण आता दुसरा मोठा धोका
weightlifting
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सनी कमाल केली आहे. त्यांनी भारताला सर्वाधिक पदक मिळवून दिली आहेत. भारतीय वेटलिफ्टर्सनी पदकं जिंकली, पण आता दुखापतीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला आहे. कॉमनवेल्थ मधून परतताना पदकांसोबतच ते दुखापतीही घेऊन येणार आहेत. भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या Jeremy Lalrinnunga ला वेटलिफ्टिंगची स्पर्धा सुरु असतानाच दुखापत झाली. रविवारी फायनलच्या दरम्यान त्याला खूपच त्रास होत होता. त्याला सरळ चालणही जमत नव्हतं. सहा प्रयत्नानंतर मंचावरुन बाहेर जाताना त्याला मदत घ्यावी लागली.

वेटलिफ्टर्सवर दुखापतीच सावट

बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला मध्ये पहिलं पदक मिळवून देणारा महाराष्ट्राचा संकेत सर्गरही दुखापतग्रस्त आहे. त्याने रौप्यपदक विजेती कामगिरी केली. पोडियमवर मेडल स्वीकारताना त्याला झालेली दुखापत स्पष्ट दिसत होती.

आजन्म दुखापत होऊ शकते का?

वेटलिफ्टिंग मध्ये आजन्म दुखापत होऊ शकते का? यावर सफदरजंग डेव्हलपमेंट एरियाचे Orthopaedic And Sports Med Centre With Physiotherapy And Rehabilitation मध्ये प्रॅक्टिस करणारे डॉ. प्रतीक गुप्ता म्हणाले की, “आपण दुखापतीवर उपचार कसे करतो, त्यावर सर्व काही अवलंबून आहे” “खेळाडूने स्वत:ची व्यवस्थित काळजी घेतली. योग्य उपचार करुन घेतले, तर आजीवन दुखापत होणार नाही. पण दुखापतीला बरं होण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही, तर त्याचा परिणाम खेळाडूवर होतो” असं डॉ. प्रतीक गुप्ता म्हणाले.

Tendonitis आणि Stress fracture मुळे होणारी दुखापत डॉक्टरांच्या लवकर लक्षात येते. पण त्यावर योग्य उपचार घेतले नाहीत किंवा दुर्लक्ष केलं, तर हीच दुखापत पुढे जाऊन गंभीर बनते. थोडेसे उपचार करुन, मैदानात गेल्यानंतर दुसरी दुखापत होऊ शकते. या दुखापती कायमस्वरुपी त्रास देऊ शकतात.