VIDEO: इंग्लिश फलंदाजाचा कहर, 14 Four-Six ठोकून संघाला मिळवून दिला विजय

| Updated on: Aug 10, 2022 | 3:35 PM

इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड (The Hundread) स्पर्धेत क्रिकेटचे रोमांचक सामने पहायला मिळत आहेत. मंगळवारी टुर्नामेंटच्या 7 व्या सामन्यात (northern superchargers vs trent rockets) नॉर्दर्न सुपरचार्जर्सला ट्रेंट रॉकेट्सने 7 विकेटने हरवलं.

VIDEO: इंग्लिश फलंदाजाचा कहर, 14 Four-Six ठोकून संघाला मिळवून दिला विजय
David-Malan
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड (The Hundread) स्पर्धेत क्रिकेटचे रोमांचक सामने पहायला मिळत आहेत. मंगळवारी टुर्नामेंटच्या 7 व्या सामन्यात (northern superchargers vs trent rockets) नॉर्दर्न सुपरचार्जर्सला ट्रेंट रॉकेट्सने 7 विकेटने हरवलं. सुपरचार्जर्सने प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूत 8 विकेट गमावून 152 धावा बनवल्या. डेविड वीसाने 27 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने संघाला विजयाची आशा दाखवली. पण रॉकेट्सचा ओपनर डेविड मलानने (dawid malan) चार्जर्सच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. मलानने 49 चेंडूत नाबाद 88 धावा ठोकल्या. आपल्या संघाला मलानने 6 चेंडू आधीच विजय मिळवून दिला.

मलानची जबरदस्त फलंदाजी

ट्रेट रॉकेट्सचा ओपनर एलेक्स हेल्स आणि मलानने कमालीची सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये 86 धावांची भागीदारी झाली. एलेक्स हेल्सने 27 चेंडूत 43 धावा फटकावल्या. डेविड मलानने आक्रमक अर्धशतक फटकावलं. या डावखुऱ्या फलंदाजाने डेविड वीस, ड्वे ब्राव्हो, वॅन डर मर्व आणि आदिल रशीदच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. मलानने आपल्या डावात 3 षटकार आणि 11 चौकार लगावले. शेवट पर्यंत नाबाद राहून त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मलानचा स्ट्राइक रेट 180 चा होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फ्लॉप

डेविड मलानला फलंदाजी करताना नशिबाची सुद्धा साथ मिळाली. दोनदा तो आऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. त्याने या मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला. मलानच फॉर्म मध्ये येणं, इंग्लंडसाठी चांगली बातमी आहे. हा डावखुरा फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी 20 सामन्याच्या सीरीज मध्ये फ्लॉप ठरला होता. मलानने 3 सामन्यात 18.33 च्या सरासरीने फक्त 55 धावा केल्या होत्या.

गुण तालिकेत ट्रेंट रॉकेट्स दोन नंबरवर

रॉकेट्सच्या टीमने दोन विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्याबाजूला लंडन स्पीरिट 2 मॅच मध्ये 2 विजयासह पहिल्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट रॉकेट्स पेक्षा चांगला आहे.